Home शहरं औरंगाबाद aurangabad News : उस्मानाबाद जिल्ह्यातील दुकाने उघडण्याचा मार्ग मोकळा - clear the...

aurangabad News : उस्मानाबाद जिल्ह्यातील दुकाने उघडण्याचा मार्ग मोकळा – clear the way for opening shops in osmanabad district


म. टा. विशेष प्रतिनिधी, उस्मानाबाद

करोना लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला आहे. राज्यात १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला गेला तरी केंद्राच्या सूचनेनुसार रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही उपाययोजना करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने तसे आदेश काढले असून त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील दुकाने अटी व शर्तींच्या अधीन राहून उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुरक्षित वावर ठेवून जिल्हांतर्गत बससेवेलाही परवानगी मिळाली आहे.

उस्मानाबाद जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असल्याने राज्य सरकारच्या निकषानुसार जिल्ह्यातील बससेवा, विविध दुकाने, मद्यविक्री दुकाने आदींचा मार्ग खुला झाला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच याची अंमलबजावणी होणार आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ग्रीन झोनमधील व्यवहार सुरळीत करण्यासाठी नियम व अटींचे पालन, सुरक्षित वावर ठेवून कामकाजाला परवानगी देण्यात आली, पण नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. ग्रीन झोनमधील निर्देशानुसार गर्दी होणारी ठिकाणे सोडली, तर इतर व्यवहार सुरळीत होण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात आले आहेत.

सिनेमागृह, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, रेल्वे सेवा, सामाजिक, राजकीय, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आदींना पुढील आदेश येईपर्यंत बंदीच राहणार आहे. अधिकृत पास असल्याशिवाय ग्रीन झोनअंतर्गत प्रवास करण्यास मनाई असेल. शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विविध क्लासेस यांना बंदी कायम आहे. तसेच ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे त्यांना राज्य सरकारने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना किंवा आदेश काढून लावलेल्या त्या विशिष्ट अटींच्या अधीन राहून ही सेवा सुरू ठेवता येतील.

Bया सेवा होऊ शकतात सुरूB

– सुरक्षित वावर पाळून ५० टक्के प्रवासी घेऊन ग्रीन झोनमध्येच आंतरजिल्हा बससेवा

– जिल्ह्यात मालवाहतूक वाहने

-उद्योग, लघुउद्योग

– स्टँड अलोन पद्धतीने दुकाने

– ई-कॉमर्स सेवा

-खासगी, सरकारी कार्यालये

– बँका, पतसंस्था पूर्णवेळ

– कुरिअर, पोस्टल सेवा

– सलून

-१९१ दारू दुकाने

-दुचाकीवर एकच,चारचाकीत तिघांना परवानगी

B(जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार यात बदल होऊ शकतो.)BSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

औरंगाबाद : २८ दिवसांत ८९ वाहने चोरीला

म. टा. प्रतिनिधी, शहरात वर्षभरापासून सुरू झालेल्या वाहनचोरीच्या घटना नित्याच्या झाल्या असून, गेल्या २८ दिवसांमध्ये विविध भागातून तब्बल ८९ वाहने चोरीला गेल्याची माहिती...

jee main february exam: जेईई मेन २०२१ फेब्रुवारी परीक्षेचा निकाल कधी? जाणून घ्या – jee main 2021 february exam result will be declared on...

हायलाइट्स:जेईई मेन २०२१ चे पहिले सत्र २३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेया परीक्षेचा निकाल ७ मार्च पर्यंत होणार जाहीरजेईई मेन २०२१1...

Mumbai power outage: Nitin Raut: मुंबईतील ‘पॉवर कट’मध्ये चीनचा हात; आज कळणार नेमकं काय घडलं? – mumbai power outage was a likely chinese cyber...

हायलाइट्स:मुंबईतील 'पॉवर कट' हा चीनचा सायबर हल्लाअमेरिकेतील प्रसिद्ध दैनिकाचा एका अहवालाच्या आधारे दावामागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी झाला होता मुंबईतील वीज पुरवठा खंडितमुंबई:...

Recent Comments