Home शहरं औरंगाबाद aurangabad News : औरंगाबादेत ‘करोना’चा कहर सुरूच; एकूण बाधित २८२ - 'karona'...

aurangabad News : औरंगाबादेत ‘करोना’चा कहर सुरूच; एकूण बाधित २८२ – ‘karona’ continues to wreak havoc in aurangabad; total affected 282


म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

शहरात शनिवारी (दोन मे) तब्बल ४० नवे करोनाबाधित आढळून आल्यानंतर, रविवारी (तीन मे) दिवसभरात आणखी २६ रुग्ण आढळले. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २८२ झाली आहे. मुकुंदवादी परिसरात सर्वाधिक ६२ बाधित आढळले आहेत. रविवारी रात्री नऊपर्यंत मृत्युची संख्या नऊपर्यंत कायम राहिली.

शहरात २७ एप्रिलपासून चाचण्यांचे प्रमाण वाढताच बाधित मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. दररोज नवीन भागांत बाधित आढळत आहेत. शनिवारी दिवसभरात ४० करोनाबाधित आढळले होते, शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी सकाळी आठपर्यंत १८ बाधित आढळले. यापैकी १७ व्यक्ती मुकुंदवाडी परिसरातील आहेत, तर बायजीपुरा येथील एकजण आहे. त्यानंतर रविवारी रात्रीपर्यंत आणखी आठ बाधित आढळल्याने बाधितांचा आकडा २८२ पर्यंत गेला आहे. नव्या आठ बाधितांमध्ये गुलाबवाडी व जयभीमनगर येथील तीन, संजयनगर येथील पाच जणांचा समावेश आहे. त्यामुळे मुकुंदवाडी येथील संजयनगर व रोहिदासनगर या भागांतील करोनाबाधितांची संख्या ६२ झाली आहे. मुकुंदवाडी हा सध्याचा सर्वांत मोठा ‘हॉटस्पॉट’ झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी आठ जणांचे स्वॅब घेण्यात आले. ४१ जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटीच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

Bदोन अंकी रग्णांचे सहा भाग B

शहरात दोन अंकी आकडे असलेले किमान सहा भाग आहेत. मुकुंदवाडी ६२, किलेअर्क ३७, नूर कॉलनी ३५, जयभीमनगर (घाटी परिसर) २४, आसेफिया कॉलनी १८, बायजीपुरा भागात १५, समतानगर ११ बाधित आहेत. धक्कादायक म्हणजे २७ एप्रिल रोजी दुपारपर्यंत शहरात केवळ ५३ बाधित होते आणि त्यानंतर सहा दिवसांत पाचपटींपेक्षा जास्त बाधित आढळून आले आहेत.

Bएका रुग्णाला उपचारानंतर सुटी B

बायजीपुरा येथील १५ वर्षीय रुग्णाचे २४ तासांतील दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला रविवारी सुटी देण्यात आली. आतापर्यंत २५ बाधित हे करोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात ९० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Bघाटीचे ६० डॉक्टर-कर्मचारी निगेटिव्हB

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत ६९ रुग्ण दाखल झाले. पैकी १२ रुग्ण संशयित असून अहवाल बाकी आहे. घाटीच्या कोव्हिड १९ वॉर्डात २५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २१ रुग्णांची स्थिती सामान्य, तर चौघांची गंभीर आहे. सध्या घाटीत ३२ कोव्हिड निगेटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण २१ कोव्हिड निगेटिव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. करोनाबाधितांच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून ६० डॉक्टर, निवासी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या स्वॅब चाचण्या करण्यात आल्या. त्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्याने घाटी प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Arnab Goswami: हक्कभंग समितीचे अर्णब गोस्वामींना समन्स; ‘हे’ आहे कारण – legislative assembly violation committee sommones to arnab goswami

टीआरपी घोटाळ्याच्या चौकशीत अडचणीत आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना विधानसभेच्या हक्कभंग समितीने समन्स बजावले आहे.  Source link

Mumbai Coastal Road Project: ‘किनारी मार्ग’ वेगात – mumbai coastal road project :100 meters of underground tunnel dug in mumbai

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या किनारी मार्गाने नुकताच एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. 'मावळा' या टीबीएम मशिनने खणल्या...

Recent Comments