Home शहरं औरंगाबाद aurangabad News : औरंगाबादेत नऊ तासांत सात रुग्णांचा मृत्यू - seven patients...

aurangabad News : औरंगाबादेत नऊ तासांत सात रुग्णांचा मृत्यू – seven patients die in nine hours in aurangabad


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या नऊ तासांमध्ये ४० ते ७९ वर्षांच्या सात करोनाबाधितांनी उपचारादरम्यान प्राण गमावले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या १२८ झाली आहे. त्याचवेळी गुरुवारी (११ जून) दिवसभरात सर्वाधिक १५५ बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २४३० झाली आहे. दिलासादायक म्हणजे आतापर्यंत १३६३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व सध्या ९३९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत घाटीमध्ये ९८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे घाटी प्रशासनाने कळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या १२८ झाली आहे.

– बाधास्वामी कॉलनी येथील ४५ वर्षांच्या पुरुष रुग्णाला पाच जून रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱ्या दिवशी रुग्ण हा बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान गंभीर श्वसनविकार, न्युमोनिया, मधुमेह आदींमुळे रुग्णाचा १० जून रोजी सायंकाळी साडेसातला मृत्यू झाला.

– कटकटगेट परिसरातील ५७ वर्षांच्या महिला रुग्णास नऊ जून रोजी दाखल केले होते व दहा जून रोजी रुग्ण ही बाधित असल्याचे निदान झाले होते. न्युमोनिया, श्वसनविकार, उच्चरक्तदाब, मधुमेहामुळे रुग्णाचा दहा जून रोजी रात्री नऊ वाजता मृत्यू झाला.

– नूतन कॉलनीतील ४० वर्षांच्या पुरुष रुग्णाला आठ जून रोजी दाखल केले होते व नऊ जून रोजी रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. गंभीर श्वसविकार व न्युमोनियाने रुग्णाचा दहा जून रोजी रात्री साडेअकराला मृत्यू झाला.

– त्रिमूर्ती नगर येथील ६७ वर्षांच्या पुरुष रुग्णास नऊ जून रोजी दाखल केले होते व दुसऱ्या दिवशी रुग्ण बाधित असल्याचे चाचणीवरून निदान झाले असतानाच, श्वसनविकार, न्युमोनियाने रुग्णाचा दहा जून रोजी रात्री साडेअकराला मृत्यू झाला.

– नागसेन नगर येथील ६० वर्षांच्या पुरुष रुग्णास सात जून रोजी दाखल केले होते व रुग्ण हा बाधित असल्याचे नऊ जून रोजी स्पष्ट झाले होते. श्वसनविकार, न्युमोनिया, मधुमेह, उच्चरक्तदाबाच्या गुंतागुंतीमुळे रुग्णाचा १० जून रोजी मध्यरात्री पावणेतीन वाजता मृत्यू झाला.

– रोशनगेट परिसरातील ६० वर्षांच्या महिला रुग्णाला चार जून रोजी दाखल केले होते व पाच जून रोजी रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. न्युमोनिया, उच्चरक्तदाब, श्वसनविकार, स्थुलत्वाच्या गुंतागुंतीतून रुग्णाचा गुरुवारी (११ जून) पहाटे साडेचारला मृत्यू झाला.

– रोशन गेट परिसरातील एकूण ७९ वर्षीय पुरुष रुग्णाचा बुधवारी मध्यरात्री दोन वाजता उपचारादरम्यान शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

– औरंगाबादेत नवे १५५ रुग्ण… ३Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

वाहतुकीचे वर्तमान आणि भविष्य

जितेंद्र अष्टेकर शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून पाच किलोमीटरच्या अंतरापर्यंत फक्त पाच रुपयांत प्रवासाची सुविधा आणि याच सार्वजनिक...

Kangana Ranaut Replied To Notice Of Mumbai Police Over Sedition Case – भावाचे लग्न आहे… कंगनाचे मुंबई पोलिसांच्या नोटिशीला उत्तर

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई देशद्रोहाच्या गुन्ह्यात पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठविल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौट हिने हजर राहण्यासाठी मुदत मागितली आहे. भावाचे लग्न असल्याने...

LIVE : मराठा आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स Source link

trp scam case: टीआरपी घोटाळा : ‘रिपब्लिक’च्या पाच गुंतवणूकदारांना समन्स – trp scam case : crime branch special squad summons to five republic tv...

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रिपब्लिक टीव्हीच्या पाच गुंतवणूकदारांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स जारी...

Recent Comments