Home शहरं औरंगाबाद aurangabad News : करोना विषाणूचा ज्योतीनगरात प्रवेश - corona virus enters jyotinagar

aurangabad News : करोना विषाणूचा ज्योतीनगरात प्रवेश – corona virus enters jyotinagar


औरंगाबाद: करोनाने मंगळवारी गणेश कॉलनी, ज्योतीनगर, विशालनगर, विद्यानिकेतन कॉलनी, फाजलपुरा, मोंढा नाका आदी नवीन भागात प्रवेश केला. ज्योतीनगरात एक महिला करोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे. ही महिला बाळांतपणासाठी दहा दिवसांपूर्वी बीडबायपास येथील माहेरी गेली होती. तिच्या लाळेचे नमुने घेतले असता ते पॉझिटिव्ह आले. ती एका खासगी रुग्णालयात नुकतीच बाळांत झाली आहे. माजी नगरसेवक गिरजाराम हळनोर, सुमित्रा हळनोर यांनी तातडीने पालिकेशी संपर्क साधून परिसरात जंतुनाशकांची फवारणी करून घेतली. मोंढानाका परिसरातील एक व्यक्ती करोनाबाधित आढळली. त्याला संपर्कातून लागण झाल्याचे स्पष्ट झाले. समतानगर, भीमनगर, पुंडलिकनगर, हुसेनकॉलनी, न्यायनगर, विद्यानगर या भागात देखील करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments