Home शहरं औरंगाबाद aurangabad News : ‘करोना’ संशयिताची माहिती दिल्याने मारहाण - 'corona' beaten for...

aurangabad News : ‘करोना’ संशयिताची माहिती दिल्याने मारहाण – ‘corona’ beaten for informing suspect


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करोना संसर्ग झालेली संशयित महिला परिसरात आल्याची माहिती ‘कोव्हिड हॉस्पिटल’ला दिल्याचा राग मनात ठेवून तरुणाला दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार शुक्रवारी (एक मे) रात्री साडेआठ वाजता एन १३, हडको कॉर्नर भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी चार संशयित आरोपीविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात मारहाणीचा

गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अर्शद हयातखान (रा. मुजफ्फरनगर) यांनी तक्रार दाखल केली. अर्शदखान हे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता बहिणीला भेटण्यासाठी महेमुदपुरा भागात गेले होते. यावेळी परिसरात त्यांना आरेफ कॉलनी येथून एक ‘करोना पॉझिटिव्ह’ मह‌िला आल्याची माहिती मिळाली. यावरून त्यांनी महापालिकेच्या ‘कोव्हिड हॉस्पिटल’ला फोन करून ही माहिती कळविली. या गोष्टीचा काही नागरिकांना राग आला. त्यांनी अर्शद यांना दगडाने बेदम मारहाण केली. याप्रकरणी अर्शद यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सय्यद आमेर सययद महेमूद, सय्यद ताहेर सय्यद महेमूद, गयास सययद आणि एका महिला आरोपी (सर्व रा. कोतवालपुरा, मिलकॉर्नर) यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जमादार निकम तपास करीत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

कारभारी लयभारी: मारहाणीच्या घटनेनंतर ‘कारभारी लयभारी’ तील गंगाने मानले मुंबई पोलिसांचे आभार – karbhari laybhari ganga pranit hate thanks mumbai police

हायलाइट्स:व्हिडिओद्वारे मानले पोलिसांचे आभारपोलिसांनी केली तात्काळ मदतमारहाणीनंतर केला होता व्हिडीओ शूटमुंबई- काही दिवसांपूर्वी 'कारभारी लयभारी' या मालिकेत गंगाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला मारहाण झाली...

rahul gandhi push up: Rahul Gandhi : राहुल गांधींचे मंचावर पुशअप्स, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल – congress leader rahul gandhi push up with student...

हायलाइट्स:राहुल गांधी तीन दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यावरविद्यार्थ्यांसोबत स्टेजवर मारले पुशअप्समंचावर विद्यार्थ्यांसोबत घेतला थिरकण्याचा आनंदचेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी...

Recent Comments