Home शहरं औरंगाबाद aurangabad News : काळे यांच्या निवडीवरील आव्हान फेटाळले - the challenge to...

aurangabad News : काळे यांच्या निवडीवरील आव्हान फेटाळले – the challenge to kale’s selection was rejected


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षक मतदारसंघातील आमदार विक्रम काळे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका, मूळ याचिकाकर्त्याने केलेल्या आक्षेपाचे कोणतेही पुरावे देता आले नाहीत; तसेच याचिकेत तथ्य नसल्याचे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी रद्दबातल ठरविली. दरम्यान, आमदार काळेंतर्फे याचिकेतील आरोप चुकीचे असून, संबंधित याचिका फेटाळावी, अशी विनंती करणारा अर्ज दाखल करण्यात आला असता सुनावणीदरम्यान खंडपीठाने काळेंच्या निवडीला आव्हान देणारी याचिका निकाली काढली.

याचिकाकर्ते व पराभूत उमेदवार संजय जाधव यांनी मूळ याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार जानेवारी/फेब्रुवारी २०१७मध्ये मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. या निवडणूकीत विक्रम काळे हे २५ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. याशिवाय प्रतिस्पर्धी उमेदवार, याचिकाकर्ते संजय जाधव यांना ११९ मते पडली होती. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. जाधव यांनी आमदार विक्रम काळे यांच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका २०१७मध्ये दाखल केली होती.

विक्रम काळे यांनी उमेदवारी अर्जासोबत चुकीची माहिती सादर केली. काळे यांच्याकडील लातूर येथील निवासस्थानाचा मालमत्ता कर थकित होता. वीजबीलही थकित होते. यासंदर्भात त्यांनी काळे दाखल केलेल्या प्रतीज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. विक्रम काळे आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही शिक्षक किंवा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी उमेदवारी अर्जात स्वतःला आणि पत्नीला प्राचार्यपदी कार्यरत असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे स्वतःसह पत्नीला उच्च शिक्षित दाखवून मतदारांची दिशाभूल केली. उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दिवशी काळे यांनी मोठी जाहीर सभा घेतली. मतदारांना जेवण दिले; तसेच केवळ जेवणासाठी एक कोटी रुपये खर्च केला असून, हे निवडणूक खर्चाच्या मर्यादेच्या बाहेर आहे. मोठ्या प्रमाणावर जाहिराती दिल्या. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार निवडणूक खर्चाचा हिशेब निवडणूक झाल्यानंतर लगोलग दाखल करावा लागतो, तो केला नाही. निवडणूक कामातील शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत केले. त्या अधिकाऱ्यांनी १५ हजार मतपत्रिका बाद असतानाही संबंधित मतपत्रिका अधिकाऱ्यांनी काळेंच्या बाजूने मोजल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आला होता.

आमदार काळे यांच्यातर्फे नंदकुमार खंदारे यांनी पुरावे नसल्याने साक्षीदार तपाण्याचा प्रश्‍नच उद्भवू शकत नाही. कोणत्याही पुरव्याशिवाय याचिकाकर्त्याने आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी, असा अर्ज दाखल केला; तसेच लोकप्रतिनिधी कायदा १९५१च्या कलम ७४नुसार विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब देणे बंधनकारक आहे, मात्र याच कायद्याच्या कलम ७५नुसार विधान परिषदेच्या उमेदवाराला संबंधित खर्चाचा हिशेब देणे बंधनकारक नाही. म्हणून खर्चाचा हिशेब दाखल केला नसल्याचा युक्तिवाद केला. सुनावणीअंती काळे यांचा अर्ज मंजूर करत खंडपीठाने याचिका निकाली काढली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shaheen afridi: ‘या’ गोलंदाजाने भारताच्या जसप्रीत बुमराहचा विक्रम मागे टाकला – pakistan shaheen afridi became quickest 100 wickets in t20

नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह(jasprit bumrah)चा टी-२० मधील विक्रम पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने मागे टाकलाय. २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहीन...

Recent Comments