Home शहरं औरंगाबाद aurangabad News : गावी परता स्वखर्चाने - return to the village at...

aurangabad News : गावी परता स्वखर्चाने – return to the village at your own cost


– औरंगाबाद जिल्ह्यात दोन हजार १४६ परराज्यातील नागरिक

– अडकून पडलेल्यांमध्ये पर्यटक, श्रमिकांचा समावेश

– स्वत:चे वाहन असलेल्यांना प्रशासन देणार पास

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘लॉकडाऊन’मुळे अडकलेले परराज्यांतील आणि महाराष्ट्राच्याच इतर जिल्ह्यांतील नागरिकांना त्यांच्या गावी जाऊ देण्यााबाबत निर्णय झाला आहे. नागरिकांना गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासन केवळ परवानगी देण्याच्या तयारीत असून, परवानगीनंतर या नागरिकांना स्वखर्चाने आपल्या गावी परतावे लागणार आहे. परवानगी मिळाली तरी या नागरिकांना बस, रेल्वे आदींची सोय, दूरचा प्रवास असल्यास या जेवणाची सोय कोण करणार, असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.

करोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली. त्यामुळे नागरिक, मजूर, कामगार, विद्यार्थी, पर्यटक अडकून पडले होते. त्यांना आपापल्या घरी पाठवण्यासंदर्भात निर्णय झाल्यानंतर प्रत्येक जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाकडून ‘ऑनलाइन’ अर्ज मागवण्यात येत आहेत. संबंधितांची शाहनिशा करून जिल्हा प्रशासनकडून नागरिकांना परवानगी देण्यात येणार आहे, मात्र मजुरांना व इतर नागरिकांना ज्या जिल्ह्यात जायचे आहे, तेथील प्रशासनाकडून अद्यापही काही माहिती समोर आलेली नाही. परवानगी मिळाली तरी या नागरिकांना गावी कसे पोचवणार, याबाबत चित्र स्पष्ट नसल्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर अडचणींचा डोंगर वाढला आहे.

२२ मार्चपासून सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात परराज्यातील दोन हजार १४६ नागरिक आहेत. शहरात अडकलेले पर्यटक, नातेवाईकांच्या घरी अडकलेले नागरिक, हॉटेल व इतर ठिकाणी काम करणारे कर्मचारी यांची संख्याही मोठी आहे. या सगळ्यांना आता आपल्या गावी जायचे आहे. हे नागरिक, मजूर, श्रमिक आपल्या नातेवाइकांशी फोनवरून संपर्कात आहेत.

या नागरिकांना त्यांच्या घरी पोचवायचे कसे याबाबत प्रशासनाच्या पातळीवर वारंवार ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ होत आहेत. याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, खाजगी बस, वाहनांची व्यवस्था प्रशासन करणार नाही. जिल्हा प्रशासन केवळ प्रवासासाठी मंजुरी देणार आहे. अनेक मजुरांकडे पैसे नाहीत, त्यांच्या जेवणाची काय व्यवस्था असेल, आंतरराज्य एसटी सोडणार का, यासारखे अनेक प्रश्न प्रशासनासमोर आहेत.

लवकरच मार्ग निघेल : जिल्हाधिकारी

जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’मुळे अडकलेल्या मजुरांची निश्चित संख्या प्रशासनाकडे आहे. या मजुरांना, नागरिकांना स्वखर्चाने आपल्या घरी जावे लागणार आहे, यासाठी त्या-त्या राज्यांची ‘एनओसी’ही लागणार आहे. अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे सोडण्याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही. स्वत:चे वाहन असलेल्यांना घरी जाण्यासाठी पास देण्यात येईल. शिवाय अनेक मजुरांकडे पैसे नाहीत. त्यांच्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. नागरिकांना घरी पाठवण्याबाबत शासनाकडून वारंवार मार्गदर्शन घेणे सुरू आहे. लवकरच मार्ग निघेल, अशी अपेक्षा असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PM Modi: pm modi : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर PM मोदी म्हणाले, ‘दलालांमुळे शेतकऱ्याची…’ – pm modi address bjp rally in coimbatore our govt that had...

कोईम्बतूरः पंतप्रधान नरेंद्र मोदी ( pm modi ) यांची कोईम्बतूरमध्ये प्रचारसभा झाली. सरकार सर्व वर्गाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. मी नुकताच एका कार्यक्रमातून...

lic ipo process: LIC IPO केंद्र सरकार लागले कामाला ; ‘एलआयसी’च्या प्रमुखांनी दिली ही महत्वाची माहिती – lic md says ipo process began

हायलाइट्स:आयपीओमध्ये एलआयसी पॉलिसीधारकांना यादेखील राखीव हिस्सा ठेवण्यात येणार आहे.केंद्र सरकार आणि एलआयसी अशा दोन्ही बाजूने आयपीओ बाबत काम सुरु चालू आर्थिक वर्षातच आयपीओची...

jalgaon breaking news: Jalgaon: रात्र झाली तरी आई व दोन मुलं शेतातून परतली नाहीत; शोध घेत असतानाच… – mother and two children found dead...

हायलाइट्स:जळगावात एका विहिरीत आई व दोन मुलांचे मृतदेह आढळले.भडगावमधील कनाशी गावातील घटनेचे गूढ अद्याप कायम.आत्महत्या की घातपात, पोलीस घेत आहेत शोध.जळगाव:जळगाव जिल्ह्यातील भडगाव...

Recent Comments