Home शहरं औरंगाबाद aurangabad News : गुटख्याची तस्करी, आरोपींना जामीन - gutkha smuggling, bail to...

aurangabad News : गुटख्याची तस्करी, आरोपींना जामीन – gutkha smuggling, bail to accused


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली परराज्यातून गुटख्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींना प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचक्यासह अटी व शर्तींवर नियमित जामीन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी शनिवारी मंजूर केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास कर्नाटकातून सोलापूर-अहमदनगर मार्गे औरंगाबादच्या बीडबायपासहून जाणारा ट्रक पकडला होता. यात कॅरेटच्या आडोशात ९० लाख रुपये किमतीच्या तीनशे गोण्यांमधून गुटख्याची तस्करी केली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी सय्यद अकील सय्यद अयूब, शेख रफीक शेख कदीर (दोघे रा. मलकापूर, जि. बुलढाणा) यांना पकडले. हा गुटखा अतिक उर्र रहेमान शफि उर्र रहेमान (रा. पांढरी, पारपेठ, मलकापूर, जि. बुलढाणा) याच्या सांगण्यावरुन सोलापूरहून जालन्याकडे जात होता. यातल्या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर आरोपींनी नियमित जामीनीसाठी अर्ज सादर केला असता न्यायालयाने तो मंजूर करुन दोघा आरोपींची प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचक्यावरसह अटी व शर्तीवर मुक्तता केली. आरोपींच्या वतीने अशोक ठाकरे यांनी काम पाहिले.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anna Hazare: अण्णा हजारेंचं आंदोलन रोखण्यासाठी भाजपचे आटोकाट प्रयत्न; उचललं ‘हे’ पाऊल – bjp trying hard to stop anna hazare from agitation

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितल्याने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता भाजपने पुढचे पाऊल टाकले आहे. कोणत्याही परिस्थितीत अण्णांचे...

Anthony Stuart: गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू; पाहा व्हिडिओ – australian cricketer anthony stuart only bowler to take a hat trick in...

नवी दिल्ली: वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत चार असे गोलंदाज झाले आहेत ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आहे. पण करिअरमधील अखेरच्या सामन्यात हॅटट्रिक घेण्याची...

bmc health officers: रात्रभर जागले पालिकेचे अधिकारी – bmc officers was facing stress due to not receiving the cowin app’s message regarding covid-19 vaccination...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकोवीन अॅपवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासंदर्भात मेसेज पाठवण्यात येणार होते. मात्र शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अॅप आणि मेसेज न...

Recent Comments