Home शहरं औरंगाबाद aurangabad News : ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीत - smooth transactions in rural...

aurangabad News : ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीत – smooth transactions in rural areas


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्याचा विचार करता दौलताबाद येथे दोन बाधितांचा अपवाद वगळता सर्वच रुग्ण हे शहरात आढळून आले आहेत. महापालिका हद्द आणि ग्रामीण भाग असे दोन टप्पे शासनाने केले होते. सवलती देण्यासाठी शहराबाहेरचा ग्रामीण भाग व नागरी भाग असे टप्पे करण्यात आले असून तालुक्याचा शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील बहुतांश व्यवहार, आस्थापने दुकाने सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आदेश काढले आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून बंद असलेली दुकाने या निर्णयामुळे खुली होणार असून किमान ग्रामीण भगातील अर्थचक्र सुरू होण्यास चालना मिळण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी असल्यामुळे हा भाग ग्रीन झोन करण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र, दौलताबाद येथील रुग्णामुळे संपूर्ण जिल्हा रेडझोनमध्ये टाकण्यात आला होता. मात्र, या आदेशामुळे आता ग्रामीण भागातील बहुतांश व्यवहार हे सुरळीत होणार आहेत. या आदेशानुसार महापालिका हद्द वगळता तसेच तालुक्याच्या ठिकाणचा नागरी भाग वगळता इतर ठिकाणचे सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत.

पोलिस आयुक्तालयाची हद्द व सर्व तालुका मुख्यालयातील नागरी भाग वगळून कंटेटमेट झोनच्या बाहेर सर्व ग्रामीण भागातील उद्योग सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत चालू ठेवण्यात येणार आहे. या शिवाय ग्रामीण भागातील सर्व बाजारपेठेतील सर्व वस्तुंची विक्री करणारे दुकाने (मॉल वगळता) सुरू ठेवणयात येणार आहे. तालुका मुख्यालय असलेल्या नागरी भागात मॉल्स, व्यापारी संकुले व बाजारेपठा मात्र बंद राहणार आहेत. मात्र, बाजारपेठेतील व व्यापारी संकुलातील आवश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत.

या शिवाय ग्रामीण भागातील सर्व बांधकामेही सुरू ठेवण्यात येणार आहे. राज्यात काही रेडझोन असलेल्या जिल्ह्यांमध्ये सरकारने मद्यविक्री करण्यास परवानगी दिली असली तरी औरंगाबाद जिल्ह्यात मात्र मद्यविक्रीच्या सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. या शिवाय संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील रेस्टॉरंटमध्ये मद्य सेवन करण्यासही मज्जाव राहणार आहे. शहरी भागामध्ये मात्र २६ मार्च, १३ एप्रिल, १९ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार लागू केलेल सर्व आदेश यापुढे १७ मे पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत कायम राहणार आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

new farm laws: farm laws : निवडणुकांमधून जनतेचे नवीन कृषी कायद्यांवर शिक्कामोर्तब, भाजपचा दावा – people support new farm laws in elections says prakash...

नवी दिल्लीः गुजरातमधील महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. नव्या कृषी कायद्यांना ( new farm laws ) शेतकरी आणि...

nanded govt officers horse latest news: ‘या’ अधिकाऱ्याला घोड्यावरून ऑफिसला यायचंय!; विनंती पत्र झालं व्हायरल – official seeks nod to tie horse on campus...

हायलाइट्स:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यातनांदेड:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात...

Recent Comments