Home शहरं औरंगाबाद aurangabad News: घरी नमाज अदा करून रमजानचा महिना सुरू - start the...

aurangabad News: घरी नमाज अदा करून रमजानचा महिना सुरू – start the month of ramadan by praying at home


‘लॉकडाऊन’मुळे यंदा रमजान महिन्यात मशिदीमध्ये तराविहची नमाज अदा करण्यात येणार नाही, असे आवाहन उलेमांनी केले आहे…

Updated:

MT

औरंगाबाद : ‘लॉकडाऊन’मुळे यंदा रमजान महिन्यात मशिदीमध्ये तराविहची नमाज अदा करण्यात येणार नाही, असे आवाहन उलेमांनी केले आहे. त्यानंतर रमजान महिन्याची चंद्रकोर दिसताच मुस्लिम धर्मियांनी आपापल्या घरी तराविहची नमाज अदा करून रमजान महिन्याची सुरवात केली.

औरंगाबाद शहराच्या आकाशात चंद्रदर्शन झाल्यानंतर अल हिलाल कमिटी आणि इमारत ए शरिया यांच्यातर्फे मराठवाड्यात रमजान महिना सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर रात्री ईशाची नमाज अदा केल्यानंतर अनेक घरांत तराविहची नमाज अदा करण्यात आली. शनिवारी पहिला रोजा असेल, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. ‘लॉकडाऊन’मुळे रमजानपूर्वीची खरेदी करण्यासाठी यंदा लगबग नव्हती. शनिवारी पहाटे रोजाबाबत मशिदीतून माहिती देण्यात आली. अनेकांनी आपला पहिला रोजाही करून रमजान महिन्याचा प्रारंभ केला.

…यंदा वेळापत्रक ‘ऑनलाइन’

रमजान महिन्यापूर्वी सहर व इफ्तार यांचे वेळापत्रत वितरित करण्यात येत असतो. यंदा ‘लॉकडाऊन’मुळे रमजान महिन्याचे छापील वेळापत्रत वितरित केले नाही. अनेकांनी रमजान महिन्याचे वेळापत्रक ऑनलाइन वितरित केले. बोहरी समाज हा मिश्री दिनदर्शिकेनुसार रमजान महिना गृहित धरतात. त्यांनी शुक्रवारी पहिला रोजा केला. उपवास केलेल्यांनी शुक्रवारी सांयकाळी पहिला रोजा आपल्या परिवारासोबत सोडला.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments