Home शहरं औरंगाबाद aurangabad News : जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना करोना - karuna to two...

aurangabad News : जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना करोना – karuna to two employees of the collector’s office


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांनंतर आता महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण होत असल्याने प्रशासन हादरले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

या संदर्भात बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर म्हणाले की, दोन्ही कर्मचारी गेल्या आठवड्याभरापासून कार्यालयात आले नाहीत. त्यांच्या संपर्कात इतर कुणी कर्मचारी आले काय याची माहिती घेण्यात येत आहे. संपर्कात कर्मचाऱ्यांना तत्काळ होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे. पाच एप्रिल रोजी महसूल विभागाच्या एका मोठ्या अधिकाऱ्याच्या वाहनचालक लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले होते. आता जिल्हाधिकारी कार्यालयातच दोन करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या शासकीय कार्यालयांत नागरिकांचा वावर सुरू झाला नसला तरी करोनासंदर्भात प्रशासकीय कामांसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामावर हजर रहावे लागत आहे. मात्र आता आरोग्य, पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाही संसर्ग होत असल्याने कर्मचाऱ्यांत भीती आणि प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आजचं राशीभविष्य… दिनांक २९ नोव्हेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक २९ नोव्हेंबर २०२० Source link

दीडदमडी : अवघी झाली गंमत…

गेल्या वर्षी २३ नोव्हेंबरला नेमकं काय झालं, यावर बरीच पुस्तकं येत आहेत. प्रत्येकाला दिसणारं सत्य वेगळं असतं, त्यामुळे या पुस्तकांमधून वेगवेगळं सत्य जगापुढे...

Recent Comments