Home शहरं औरंगाबाद aurangabad News: तरुणाचा खून करणाऱ्या ‘ते’ सात जण हर्सूलमध्ये - the 'they'...

aurangabad News: तरुणाचा खून करणाऱ्या ‘ते’ सात जण हर्सूलमध्ये – the ‘they’ who killed the young man are the seven in hersul


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bनळावर पाणी भरत असलेल्या महिलांना एक टक पाहणाऱ्या टवाळखोर टोळक्याला समजाविण्याच्या कारणावरून तरुणाला रस्त्यात अडवून त्याचा खून केल्या प्रकरणात अटक केलेल्या सातही आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.यू. न्याहारकर यांनी शनिवारी दिले.

अशोक शहाजी कीर्तीशाही (६३), कुणाल अशोक कीर्तीशाही (३०), मनोज अशोक कीर्तीशाही (२८), सोनू अनिल भारसाखळे (२१), छाया अशोक कीर्तीशाही (५०), मंदा अनिल भारसाखळे (४०, सर्व रा.बनेवाडी) व प्रदीप प्रकाश रॉय (२७, रा. राहुलनगर) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात मृत विकास विजय झाल्टे (४३) याचा भाऊ प्रकाश विजय झाल्टे (३७, रा. गल्ली नं. १ बनेवाडी, रेल्वेस्टेशन) याने तक्रार दिली. प्रकाश झाल्टे यांची भावजय रजनी ही १७ एप्रिल रोजी सायंकाळी नळावर पाणी भरत असताना काही टवाळखोर तिच्याकडे एक टक पाहत होते. ही बाब तिने पती युवराजला सांगितली. युवराज टवाळखोरांना समजाविण्यास गेले असता सोनू भारसाखळे, कुणाल कीर्तीशाही व त्याच्या साथीदारांनी युवराजला शिविगाळ करत लाठ्या काठ्याने मारले. जखमी युवराजने पत्नी व आईसह वेदांतनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. कामावरून घरी आल्यानंतर विकास झाल्टे याला ही बाब माहिती झाली. त्यामुळे तो देखील पोलिस ठाण्याचा दिशेने निघाला. रस्त्यात अशोक कीर्तीशाही, कुणाल कीर्तीशाही व त्यांचा साथीदारांनी विकासला अडवून लाठ्या-काठ्या आणि फावड्याच्या दांडयाने मारहाण केली. बेशुद्ध अवस्थेत विकासला घाटीत दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

सटाण्यातील व्यावसायिक माखिजा यांची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा सटाणा शहरातील बागलाण ब्रॅण्डी हाऊसचे संचालक (वय ६२) यांनी रविवारी सायंकाळी लोहणेर येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी मारून ...

व्यापारी सासूरवाडीला गेला होता, फ्लॅटवर परतल्यानंतर दृश्य बघून हादरलाच

म. टा. प्रतिनिधी, : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर)...

oppo a15: ओप्पोचा हा बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्त, कंपनीकडून मोठी कपात – oppo a15 gets a rs 1,000 price cut in india, know new...

नवी दिल्लीः ओप्पोने आपला बजेट स्मार्टफोन OPPO A15 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे या फोनची किंमत आता १० हजार रुपयांपेक्षा कमी...

Recent Comments