Home शहरं औरंगाबाद aurangabad News : थुंकाल तर करावी लागेल सार्वजनिक सेवा - if you...

aurangabad News : थुंकाल तर करावी लागेल सार्वजनिक सेवा – if you spit, you have to do public service


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, धुम्रपान केल्यास दंडासह विविध शिक्षेची तरतूद यापूर्वीही होतीच. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग कायद्याअंतर्गत आता दहा हजारांपर्यंतच्या दंडासह पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेपर्यंत आणि पुन्हा सार्वजनिक ठिकाणी सेवा करण्याची शिक्षाही भोगावी लागणार आहे. पुन्हा पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या गुन्ह्यानुसार शिक्षेचा कालावधी वाढवण्यात आला आहे. मात्र या कायद्याची तरी अंमलबजावणी होणार आहे का, असाही प्रश्न आतापर्यंतच्या अनुभवावरून उपस्थित होत आहे.

साथरोग कायद्याअंतर्गत २९ मे रोजी राज्य शासनाने आदेश जारी केला आहे. त्यानुसार मुंबई पोलिस अधिनियमच्या (१९५१) कलम ११६ नुसार, कायदा मोडणाऱ्याला पहिला गुन्हा असेल तर एक हजार दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागणार आहे. दुसरा गुन्हा असेल तर तीन हजार दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा, तर तिसरा व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी पाच हजार दंड व पाच दिवस सार्वजनिक सेवा करावी लागणार आहे. भारतीय दंड संहितेच्या (१८६०) कलम २६८ नुसार दंड, कलम २६९ व २७२ नुसार सहा महिने शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, २७० नुसार दोन वर्षे शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम २७८ नुसार पाचशे रुपयांपर्यंत दंड असेल. तसेच सिगारेट आणि अन्य तंबाखुजन्य उत्पादने कायद्याच्या (२००३) कलम ४ नुसार दोनशे रुपयांपर्यंतचा दंड, कलम ५ नुसार पहिला गुन्हा असेल, तर एक हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन वर्षे शिक्षा किंवा दोन्ही व दुसरा गुन्हा असेल तर पाच हजारांपर्यंतचा दंड किंवा पाच वर्षे शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा असेल. कलम ६ अ व ब नुसार दोनशे रुपये दंड असेल. कलम ७ अन्वये उत्पादकाचा पहिला गुन्हा असल्यास पाच हजारांपर्यंतचा दंड किंवा दोन वर्षे शिक्षा किंवा दोन्ही, तर दुसरा गुन्हा असेल तर दहा हजारांपर्यंतचा दड किंवा पाच वर्षांची शिक्षा असेल. विक्रेत्याचा पहिला गुन्हा असेल तर एक हजारांपर्यंतचा दंड किंवा एक वर्ष शिक्षा आणि दुसरा गुन्हा असेल, तर तीन हजारांपर्यंतचा दंड किंवा दोन वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे.

Bआदेश सर्वत्र राहणार लागूB

साथरोग कायद्याअंतर्गत देण्यात आलेले आदेश राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, विविध मंडळे, परिमंडळे, महामंडळे, औद्योगिक-व्यावसायिक-वाणिज्य क्षेत्र व परिसर, शैक्षणिक, वैद्यकीय, देवस्थाने, पर्यटनस्थळे व प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी लागू राहणार आहेत, असे शासन आदेशात नमूद केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kitab-i-Nauras book: सांगीतिक मूल्यांचा ऐतिहासिक ग्रंथ – dr balasaheb labade book review on kitab-i-nauras book

डॉ. बाळासाहेब लबडे'किताबे नवरस' हा मूळ विजापूरचा सुलतान इब्राहीम आदिलशहा दुसरा याने दखनी भाषेत लिहिलेला ग्रंथ. या ग्रंथाचा डॉ. सय्यद याह्या नशीत यांनी...

फोटो काढण्याच्या नादात महिलेने गमावला जीव

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर किल्ल्यावर कुटुंबीयांसह फिरायला आलेल्या महिलेचा किल्ला चढतेवेळी फोटो काढताना पाय घसरून दगडावर पडल्यने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी...

Recent Comments