Home शहरं औरंगाबाद aurangabad News : दारू विक्रेत्यांना हवा पोलिस बंदोबस्त - liquor dealers air...

aurangabad News : दारू विक्रेत्यांना हवा पोलिस बंदोबस्त – liquor dealers air police coverage


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारू विक्रीला परवानगी मिळाली नाही तोच दुसऱ्याच दिवशी मंगळवारी शहरातील एखाद दुसरे दुकान वगळता सर्व बिअर व वाइन शॉप बंद राहिले. दुकानासमोर होणारी गर्दी, घरपोच सेवा देण्यात कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणीमुळे विक्री करणे अशक्य झाल्याचे सांगत दुकानदारांनी पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

प्रदीर्घ लॉकडाऊननंतर सोमवारपासून (एक जून) दारू विक्री सुरू झाली. शहरात घरपोच सेवा, तर ग्रामीण भागात थेट विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. वाईन व बिअर शॉपीचालकांनी सोमवारचा अनुभव लक्षात घेऊन सकाळी दहा वाजता दुकाने उघडली नसल्याने मद्यपींची अडचण झाली. त्यांनी संपर्क केला असता फोन व व्हॉटसअॅपद्वारे मागणी नोंदवण्याचे सांगण्यात आले. दुकानासमोरही क्रमांक लिहले असताना मद्यपी विनाकरण गर्दी करतात. घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दमदाटी झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे एक ते दोन दुकाने वगळता शहरातील सर्व बिअर व वाइन शॉप बंद होते. पोलिस बंदोबस्त मिळाला तर व्यवसाय करण्यास अडचण येणार नाही, असे वाइन शॉपचालक लक्ष्मीकांत कोल्हे यांनी सांगितले. दरम्यान, कोल्हे यांच्यासह महेंद्र जैस्वाल, गिरीष अय्यर, राजुशेट आदींनी जिल्हाधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांसह राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षकांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. दरम्यान, पहिल्याच दिवशी आठ हजारांवर मद्यपींनी घरपोच मागणी नोंदविल्याची माहिती एका मद्यविक्रेत्याने दिली.

Bपोलिसांना पत्र B

‘बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासनाकडे विनंतीपत्र सादर केले असून निर्देशाप्रमाणे दुकाने सुरू ठेवा, नियमांचे पालन करा, अशा सूचनाही विक्रेत्यांना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल. ग्रामीण भागात दारू विक्री सुरळीत सुरू आहे,’ अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम यांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

उचित संधी

आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्य साध्य करण्याच्या हेतूने गेली दोन दशके कार्यरत असलेल्या या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ताज्या अधिवेशनात करोनाचे थैमान आणि कोलमडलेल्या हे...

Deepesh Sawant’s Allegations Are False, NCB Tells To Bombay High Court – सुशांतसिंह आत्महत्या: दीपेश सावंतचे ‘ते’ आरोप खोटे?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मदतनीस दीपेश सावंत याने एनसीबीवर केलेले आरोप खोटे आहेत. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चौकशीसाठी बोलावले...

Recent Comments