Home शहरं औरंगाबाद aurangabad News : दुसऱ्या लाटेस थोपविण्यास प्रशासन सज्ज - the administration is...

aurangabad News : दुसऱ्या लाटेस थोपविण्यास प्रशासन सज्ज – the administration is ready to block the second wave


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेचे प्रशासन सज्ज आहे. आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे. औषधी आणि किटस् देखील पुरेसे आहेत, असा दावा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी (२४ नोव्हेंबर) पत्रकारांशी बोलताना केला.

करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन देश आणि राज्य पातळीवर तयारी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने केलेल्या तयारीबद्दल पत्रकारांनी विचारले असता प्रशासक पांडेय माहिती देत होते. पांडेय म्हणाले, ‘कोविड केअर सेंटर्समधून चार हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था आज देखील कायम आहे. ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’मध्ये दोन हजार बेडची व्यवस्था आहे. करोना संसर्गाच्या काळात नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी म्हणून डॉक्टर्स, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या जानेवारी अखेरपर्यंत कायम राहतील. त्यात कपात केली जाणार नाही.’

औरंगाबाद जिल्ह्याची एकत्रित माहिती देताना पांडेय म्हणाले, ‘जिल्ह्यात ५४४ आयसीयू बेड आहेत, त्यापैकी सध्या ५२३ बेड रिकामे आहेत. २०९ व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून, त्यापैकी १९९ व्हेंटिलेटर्सचा सध्या उपयोग होत नाही ते रिकामेच आहेत. एक हजार ७५५ ऑक्सिजन बेड आहेत, त्यापैकी १७०७ बेड रिकामे आहेत. जिल्हाभगात ‘कोविड केअर सेंटर्स’मधून सहा हजार ७०४ बेड आहेत, त्यांच्यापैकी सहा हजार ७४४ बेड रिकामे आहेत. त्यामुळे आवश्यक ती पायाभूत सुविधा तयार आहे, मनुष्यबळ देखील आहे. औषधी आणि ऑक्सिजन देखील पुरेसा आहे. २६ हजार ४७० पीपीई किट, ६८ हजार एन – ९५ मास्क उपलब्ध आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांचे किट देखील पुरेसे आहेत आणि आता नव्वद टक्के चाचण्या आरटीपीसीआर पद्धतीच्याच केल्या जाणार आहेत.’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anna Hazare Writes PM Modi: Farmers Protest: स्पष्ट काय ते सांगून टाका, विषय सोडून देऊ; अण्णांचे मोदींना निर्वाणीचे पत्र – anna hazare writes to...

अहमदनगर: ‘जर मागण्या मान्य करायच्या नसतील तर सरकारने स्पष्ट सांगावे, त्यामुळे मागणी करणारे लोक विषय तरी सोडून देतील. देश चालविणाऱ्या सरकारला खोटे बोलणे...

nashik mayor satish kulkarni: मग कर्ज काढण्याचे धाडस करा; शिवसेनेचा महापौर कुलकर्णी यांना टोला – shivsena leader ajay boraste taunts to nashik mayor satish...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकविकासकामांसाठी कर्ज काढण्यास विरोध करणाऱ्या शिवसेनेला असमंजस ठरवणाऱ्या महापौर सतीश कुलकर्णी यांच्यावर शिवसेनेने पलटवार केला आहे. भाजपला कर्ज काढण्याची...

jinsi police station aurangabad: सुनेवर अत्याचार; सासऱ्याला अटक – aurangabad police arrested 48 years old man for sexual harassment with daughter in law

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादघरी कोणी नसल्याची संधी साधत सुनेवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या ४८ वर्षांच्या नराधम सासऱ्याला जिन्सी पोलिसांनी रविवारी (१७ जानेवारी) रात्री अटक...

bollywood celebrity on indian victory: भारतीय क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विजय, बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणाले … – india vs australia celebrities congratulate indian cricket team for...

मुंबई: अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने ०० विकेटनी विजय मिळवत मालिका २-१...

Recent Comments