Home शहरं औरंगाबाद aurangabad News : दोन लुटारूंच्या कोठडीत वाढ - an increase in the...

aurangabad News : दोन लुटारूंच्या कोठडीत वाढ – an increase in the cell of two robbers


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यात अडवुन लुटमार करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींच्या कोठडीत गुरुवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी बुधवारी दिले. लहु रमेश चव्हाण (वय २५) व विशाल बाळासाहेब जाधव (वय २२, दोघे रा. मुकुंदवाडी) अशी त्यांची नावे आहेत. या टोळीने बीड बायपासवर तिघांना लुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात शेख नाजीम शेख समशेर (वय २५, रा. रहीमपूर ता. गंगापूर) यांनी तक्रार दिली. नाजीम हे २३ मे रेाजी दुपारी साडेबारा वाजता नाजीम त्यांच्या छोटा हत्ती वाहनातील माल उतरवून शेंद्रा एमआयडीसी येथून वाळूज एमआयडीसीकडे जात होते. ते बीड बायपासवरील एका हॉटेलसमोर लघुशंकेसाठी उतरले असता पाणी मागण्याच्या बहाण्याने त्यांना तिघांनी शंभर रुपयांची मागणी केली. त्यास नकार दिल्यामुळे दोघांनी त्यांना पकडून ठेवले व तिसऱ्याने खिशातील सात हजार नऊशे रुपये हिसकावले होते. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करून दोघांना अटक केली. न्यायालयाने आरोपींना आजपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी दरम्यान आरोपींनी २३ मे रोजी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी शाखेतील व्यवस्थापक प्रशांत सुरेश शिरभाते (वय ३५, रा. नेरुळ, नवी मुंबई) व कारचालक विजय विठोबा वानखेडे (वय ४०, रा. संजयनगर, गल्ली क्र. बी-९) यांना लुटल्याची कबुली दिली. त्याच्याकडून या तिन्ही गुन्ह्यातील काही ऐवज हस्तगत केला आहे.

Bसाथीदाराचा शोध B

कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील किशोर जाधव यांनी आरोपींकडून गुन्ह्यातील उर्वरित ऐवज हस्तगत करणे, आणखी कोणी साथीदार आहेत याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करण्यात आली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Road Accidents in India: हा तर निव्वळ आत्मघात – road accidents after lockdown in india

करोनामुळे देशभरात वाहतूक मंदावली होती आणि त्यामुळे अपघात व अपघाती मृत्यूंची संख्याही कमी झाली होती. मात्र, आता टाळेबंदी संपल्यानंतर पुन्हा रस्तेअपघातांचे प्रमाण करोनापूर्व...

burglary cases in mumbai: मुंबईत वाढल्या घरफोड्या – burglary cases have increased in mumbai after lockdown

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई करोना संकटामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे नियंत्रणात असलेल्या मुंबईतील चोऱ्या आणि घरफोड्या पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. लॉकडाउन असल्याने...

Recent Comments