Home शहरं औरंगाबाद aurangabad News: नशेच्या गोळ्यांची विक्री; व्यापाऱ्याला कोठडी - sale of intoxicating pills;...

aurangabad News: नशेच्या गोळ्यांची विक्री; व्यापाऱ्याला कोठडी – sale of intoxicating pills; the merchant’s closet


Bम टा प्रतिनिधी, औरंगाबादBचेलिपुरा भागात नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला औषधी प्रशासन व पोलिसांनी छापा मारून अटक केली…

Updated:

MT

Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bचेलिपुरा भागात नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला औषधी प्रशासन व पोलिसांनी छापा मारून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी एस. यू. न्याहारकर यांनी शनिवारी दिले. शेख अतिक शेख अब्दुल्ला (४२, रा. चेलिपुरा, खत्री रुग्णालयाजवळ) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात औषधी निरीक्षक राजगोपाल मुलचंद बजाज (५३) यांनी तक्रार दिली होती. चेलिपुरा भागात नशेच्या गोळ्यांची सर्रासपणे विक्री होत असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांना मिळाली. त्यावरून पोलिस नाईक संजय नंद, तायडे, देशराज मोरे, बालाजी तोटेवाड, माजीद पटेल, संतोष शंकपाळ व औषधी प्रशासनाचे निरीक्षक राजगोपाल बजाज यांनी शुक्रवारी छापा मारला. सुरुवातीला शेख अतिकच्या खिशातून अल्प्राझोलमच्या तीन स्ट्रिप्स जप्त केल्या. त्यानंतर त्याच्या घरझडतीतून आणखी नशेच्या गोळ्या अशा सुमारे चार हजार ७७६ रुपये किंमतीच्या गोळ्या जप्त केल्या. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले. आरोपीने नशेच्या गोळ्या कोठून व कोणाकडून आणल्या, कोणाला विक्री करणार होता याचा तपास करणे आहे. तसेच आरोपीने गोळ्यांच्या स्ट्रीप्स वरील बॅच क्रंमांक पुसून टाकला आहे. त्याबाबतही आरोपीकडे चौकशी करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Audio clip of Shiv Sena’s BMC corporator: पालिकेत सेना-भाजप संघर्ष – bjp corporators agitation against shivsena over audio clip of shiv sena’s bmc corporator...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढीस लागत असून, मुंबई पालिकेतही त्याचे पडसाद उमटत आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत...

Recent Comments