Home शहरं औरंगाबाद aurangabad News : नांदेड खून: आरोपीला तेलंगणातून अटक - nanded murder: accused...

aurangabad News : नांदेड खून: आरोपीला तेलंगणातून अटक – nanded murder: accused arrested from telangana


नांदेड: उमरी तालुक्यातल्या नागठाणा येथील मठाधिपती बालयोगी निर्वाणरुद्र पशुपती महाराज यांच्यासह अन्य एका भक्ताची हत्या केल्याचा आरोप असलेल्या साईनाथ आनंद लिंगाड याला पोलिसांनी तेलंगणातून अटक केली.

या हत्याकांडानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक विजय मगर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पवार यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी धावले. निष्पाप साधूची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांना त्वरित अटक करा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका भाविकांनी घेतल्यानंतर आरोपीच्या अटकेसाठी ठिकठिकाणी पथक तैनात करण्यात आली. संशयित साईनाथ लिंगाडे हा तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यातील तानूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेलंगणातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याच्या मुसक्या आवळल्या. चोरी करण्याच्या उद्देशातूनच हे हत्याकांड झाले असावे, असे सकृतदर्शनी वाटत असले तरी आम्ही सर्व बाजुने तपास करीत आहोत, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट कले. साईनाथ लिंगाडे याला अटक करण्यात आले असून त्याला उद्या न्यायालयापुढे उभे करण्यात येणार आहे.

आरोपीला अटक केल्यानंतर कायदेशीर सोपस्कार व उत्तरीय तपासणीची प्रकिया पूर्ण करण्यात आली असून रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पशुपती महाराजांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून जिल्ह्यातील सर्व मठांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

Bपोलिसांच्या दुर्लक्षामुळे हत्याकांडाचा आरोप B

संशयित आरोपी साईनाथ याने यापूर्वीही एक खून केला होता. त्याला सात वर्षांची शिक्षाही झाली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर तो काही दिवसापूर्वी पॅरोलवर बाहेर आला होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून तो अनेकांना धमकावून चोरी करत होता. याबाबत उमरी पोलिसांकड तकार करण्यात आली. पण त्यांनी दुर्लक्ष केल्याने हे हत्याकांड झाल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.

Bसर्वधर्मियांचे श्रद्धास्थान B

कर्नाटकाच्या बेल्लारी येथील रहिवासी असलेले पशुपती महाराज २००८ मध्ये नागठाणा येथील मठाच्या गादीवर विराजमान झाले होते. अल्पावधीतच महाराजांच्या समाजसेवेचे कार्य अनेक गावात पोहचले होते. पंचक्रोशीतल्या ५०० पेक्षा जास्त मंदिराच्या कळसारोहणाचा कार्यकम त्यांनी केला होता. व्यसनमुक्ती, स्वच्छता याबाबत त्यांनी प्रबोधन केले होते. केवळ वीरशैव धर्मातच नव्हे, तर या परिसरातील अठरापगड जाती-धर्मामध्ये पशुपती महाराजांना मोठे आदराचे स्थान होते. वेगवेगळ्या शासकीय योजना गावात प्रभाविपणे राबविणाऱ्या महाराजांनी व्यसनमुक्ती तसेच स्वच्छतेवर नेहमी भर दिला. त्यांच्या संकल्पनेतील गोशाळेचे काम अंतिम टप्प्यात असताना त्यांची हत्या झाल्याने भाविकांमध्ये शोककळा पसरली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Recent Comments