Home शहरं औरंगाबाद aurangabad News : नाभिक समाजाचे मूक आंदोलन - the silent movement of...

aurangabad News : नाभिक समाजाचे मूक आंदोलन – the silent movement of the nuclear community


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘अनलॉक एक’मध्ये राज्य सरकारने इतर व्यवसायांना परवानगी दिली, पण सलून व ब्युटी पार्लर बंद आहेत. त्यामुळे सलून मालक व कारागिरांची उपासमार होत आहे. पालिका क्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी नाभिक समाजातर्फे करण्यात आली. संत सेना भवन येथे सुरक्षित वावराचे नियम पाळून काळ्या फिती लावून, हातात फलक घेऊन निर्णयाचा निषेध करण्यात आला.

लॉकडाऊन जारी झाल्यापासून संपूर्ण राज्यात सलून व्यवसाय बंद आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर, पैठण अशा काही निवडक तालुक्यांत परवानगी आहे. मात्र पालिका क्षेत्रात दुकाने उघडण्याविषयी धोरण जाहीर केलेले नाही. शहरात तीन हजार सलून असून जवळपास आठ हजार कुटुंबांची उपजीविका या व्यवसायावर आहे. त्या सर्वांची उपासमार होत आहे. या आंदोलनात प्रा. राजकुमार गाजरे, गिरिजा क्षीरसागर, प्रभाकर लिंगायत, कचरू जाधव, नवनाथ घोडके, बाबासाहेब अपार, नीलेश हरणे, मनोज जाधव, शेखर क्षीरसागर, मनोज जाधव, राजू हिवरे, मुरलीधर वखरे, गणेश जाधव, हरिश सुरडकर आदींची उपस्थिती होती.

Bआंदोलकांच्या मागण्या B

सलून व्यावसायिक व कारागिरांना प्रति व्यक्ती १० हजारांची तत्काळ मदत द्यावी, त्यांना विम्याचे संरक्षण मिळावे, सुरक्षा नियमांचे पालन करून सलून सुरू करण्याची परवानगी द्यावी, सुरक्षा किट मोफत उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sangli: Sangli: तरुणीने व्हिडिओ कॉल करून तरुणाला नग्न होण्यास सांगितले, अन् – sangli unidentified woman blackmailing 20 year old man and extorting

म. टा. प्रतिनिधी, सांगली: अनोळखी तरुणीने व्हिडिओ कॉल करून तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विश्वास संपादन करून व्हिडिओ कॉलद्वारे त्याचे नग्न अवस्थेतील फोटो आणि...

Raosaheb Danve: खडसे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच; दानवेंची नवी माहिती – eknath khadse originally belongs to ncp, says raosaheb danve

मुंबई: एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्यावर चौफेर हल्ले सुरू आहेत. खडसे यांच्या बाबतीत...

Recent Comments