Home शहरं औरंगाबाद aurangabad News : नियम पाळा, अन्यथा कडक लॉकडाऊन - follow the rules,...

aurangabad News : नियम पाळा, अन्यथा कडक लॉकडाऊन – follow the rules, otherwise strict lockdown


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘शहर आणि ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोठ्या उद्योगांमधील कामगारांना करोनाची लागण झाली आहे. लोकांनी ऐकले नाही, नियम पाळून स्वत:ची काळजी घेतली नाही, तसेच संस्थात्मक क्वारंटाइन ऐवजी होम क्वारंटाइन राहण्याचा प्रयत्न केला, तर कडक लॉकडाऊन करावा लागेल,’ असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेंकर यांनी सांगितले.

‘उद्योग सुरू झाले मात्र करोनाबाबत काळजी घेण्याबाबत काही उद्योगांचा प्रतिसाद बरोबर नाही, एका बड्या उद्योगामध्ये १०० पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. क्वारंटाइनही त्यांचे त्यांनाच करावे लागणार आहे. येत्या काळात लहान-मोठ्या उद्योगांनी याबाबत काळजी घेतली नाही, प्रतिसाद दिला नाही, तर वेळ पडल्यास शहरासह वाळूजमधील उद्योगही १५ दिवस बंद करावे लागतील,’ असेही त्यांनी सांगितले.

तीन ते पाच जून दरम्यान नियमांचे पालन करण्याच्या अटींवर शहरात टप्प्या-टप्प्याने सर्व व्यवहार सुरू करण्यात आले, या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळाले. मात्र करोनाचा धोका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातही करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहर परिसरातील उद्योगांनाही नियम व अटींच्या आधारावर उद्योग सुरू करण्याची परवानगी मिळाली. मात्र वाळूजमधील बड्या उद्योगांमधील कामगारांनाही करोनाची लागण झाली आहे.

दोन अधिकारी जिल्हा प्रशासनाकडे

वाढत असलेली रुग्णसंख्या तसेच करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर बोलताना विभागीय आयुक्त केंद्रेकर म्हणाले की, उद्योगांनाही करोना नियंत्रणासंदर्भात काळजी घ्यावी लागणार आहे. विभागीय आयुक्त कार्यायातील उपायुक्त शिवानंद टाकसाळे तसेच शिवाजी शिंदे हे दोन अधिकारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

love jihad: महाराष्ट्र-उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’चा वाद, पण हा शब्द आला कुठून? – love jihad origin controversy explained in bareilly and after tanishq advertisement

'लव्ह जिहाद' या शब्दावरून देशात काही ठिकाणी वाद सुरू आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची...

coronavirus in maharashtra: राज्यात करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ; रिकव्हरी रेटही वाढला – maharashtra reports 8,142 new covid 19 cases and 23,371 discharges in the...

मुंबईः राज्यात आज १८० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज तब्बल २३ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यातील...

E Commerce company festive sale: आॅनलाईन शाॅपींग जोरात ; ई-कॉमर्स कंपन्यांची चार दिवसांत २२००० कोटींची विक्री – e commerce festive season sale worth rs...

बेंगळुरू : नवरात्री सोबतच ई-कॉमर्स कंपन्यांचा शॉपींग फेस्टिव्हल सुरु झाला आहे. जास्तीत जास्त सवलती आणि आकर्षक ऑफर्समधून प्रत्येक कंपनी ग्राहकांना भूरळ पडत आहेत....

Recent Comments