Home शहरं औरंगाबाद aurangabad News : न्यायनगर, हुसेनकॉलनी, पुंडलिकनगर नवे ‘डेंजर स्पॉट’ - nayanagar, hussain...

aurangabad News : न्यायनगर, हुसेनकॉलनी, पुंडलिकनगर नवे ‘डेंजर स्पॉट’ – nayanagar, hussain colony, pundaliknagar new ‘danger spot’


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता न्यायनगर, हुसेन कॉलनी, पुंडलिकनगर हे आता ‘डेंजर स्पॉट’ ठरू लागले आहेत. त्यात आता विद्यानगरची देखील भर पडली आहे. विद्यानगरात एकच रुग्ण सापडला आहे. या भागातील नागरिकांनी काटेकोरपणे ‘लॉकडाऊन’चे पालन केल्यास रुग्ण वाढीला या ठिकाणी आळा बसण्याची शक्यता आहे.

करोनाबाधित रुग्णांची संख्या आता पर्यंत आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी, जलाल कॉलनी, भीमनगर, नंदनवन कॉलनी, किराडपुरा, सिडको एन-सहा, एन-चार, एन-दोन आदी भागात वाढतानाचे चित्र होते. त्यानंतर रुग्णंची संख्या मुकुंदवाडी भागातील संजयनगर, रामनगरमध्ये अचानक वाढली. रुग्णवाढीचा या दोन्ही वसाहतींमध्ये विक्रमच झाला. त्यामुळे नागरिक देखील घाबरून गेले. जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी वारंवार या भागाला भेट देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या भागातील लोकप्रतिनिधींना सोबत घेतले. त्याचा परिणाम म्हणून गेल्या दोन दिवसांत या भागातील रुग्णांची संख्या तुलनेने कमी झाली आहे.

संजयनगर, रामनगरमधील रुग्णांची संख्या कमी होतानाच पुंडलिकनगर, न्यायनगर, हुसेन कॉलनी या भागात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. रविवारी हुसेन कॉलनीत आठ, पुंडलिकनगरात पाच, न्यायनगरात एक रुग्ण सापडला. याच वसाहतींना जोडून सेव्हन हिल्स परिसरात असलेल्या विद्यानगरात देखील एक रुग्ण सापडला. पुंडलिकनगर, न्यायनगरात रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे या भागात चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून नागिराकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

violence at red fort in delhi: tractor rally violence : लाल किल्ल्यावर झेंडा लावणारा तरुण तरण तारणचा, तीन मुलींसह आई-वडील बेपत्ता – violence at...

भिखविंड (तरण तारण) : दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा ( violence at red fort ) लावणारा जुगराज सिंग हा तरुण...

Recent Comments