Home शहरं औरंगाबाद aurangabad News: पाच दुकानांवर कारवाईचा बडगा - action shop at five shops

aurangabad News: पाच दुकानांवर कारवाईचा बडगा – action shop at five shops


म. टा. प्रतिनिधी, कन्नड

‘कोविड – १९’ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन करून कन्नड तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांना चढ्या दराने धान्य दिल्याचे तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या निर्दशनास आले. त्यामुळे तहसीलदार संजय वारकड यांनी शनिवारी (१८ एप्रिल) पाच स्वस्त धान्य दुकानांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.

तालुक्यामध्ये २३९ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. शासन निर्देशाप्रमाणे एप्रिल महिन्याचे धान्य तहसील कार्यालयाने कन्नड व पिशोर येथील गोदामातून द्वारपोच योजनेद्वारे पाच एप्रिलपर्यंत सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये वितरित केले. गहू दोन रुपये किलो व तांदूळ तीन रुपये किलो या दराने पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्याचे आदेश दिले आले होते. सध्या ‘लॉकडाऊन’ परिस्थितीमध्ये या सर्व दुकानदारांना पात्र शिधापत्रिकाधारकांना वरील दराने धान्य देण्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी निर्देश दिले होते. यासाठी तहसीलदार संजय वारकड यांनी नायब तहसीलदार पुरवठा शेख हारूण, तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी यांना धान्य वाटपाच्या वेळी भेटी देण्याचे आदेश दिले होते. या तपासणीमध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार यांना काही स्वस्त धान्य दुकानदार यांनी चढ्या दराने पात्र गहू व तांदूळ विक्री करीत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी पावती देत नसल्याचे आढळून आले. या सर्व तक्रारींचा शहानिशा करून तालुक्यातील पाच स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. यामुळे अनियमितता, गैरव्यवहार करणाऱ्या सर्व दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

कारवाई करण्यात आलेली दुकाने

पळशी खुर्द (१६२), रिठ्ठी (४७), ओराळा (७६), भोकनगाव (४९), देवगाव रंगारी (२१९)

(कंसात दुकान क्रमांक)

‘लॉकडाऊन’मुळे अनेक विकासाची कामे बंद असल्यामुळे मजुरांच्या, कष्टकऱ्यांच्या हाताला काम राहिले नाही. अशावेळी प्रशासन लाभार्थींपर्यंत धान्य पोचण्यासाठी विशेष काळजी घेत आहे.

– संजय वारकड, तहसीलदार, कन्नड





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

virat kohli: IND vs ENG : सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितली कोणाकडून झाली मोठी चुक… – ind vs eng : after winning 3rd test match...

अहमदाबाद, IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली,...

corona latest updates: coronavirus in maharashtra updates: आजही नव्या करोनारुग्णांच्या संख्येत ८ हजारांहून अधिक वाढ – coronavirus latest updates maharashtra registers 8702 new covid...

हायलाइट्स:आज दिवसभरात तब्बल ८ हजार ७०२ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ८ हजार ८०७ इतकी होती. तर, आज ३...

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कारमध्ये स्फोटके आढळल्याने खळबळ – abandoned car near mukesh ambanis residence antilia triggers bomb scare

हायलाइट्स:मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या.कंबाला हिल भागातील अँटिलिया टॉवरजवळ पोलीस बंदोबस्त वाढवला.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनेची घेतली गंभीर...

Recent Comments