Home शहरं औरंगाबाद aurangabad News: पोटात असतानाच बाळाची ऑनलाइन विक्री! - sell baby online with...

aurangabad News: पोटात असतानाच बाळाची ऑनलाइन विक्री! – sell baby online with stomach!


म टा प्रतिनिधी, औरंगाबादबाळ दत्तक देण्याचा ऑनलाइन बाजार मांडत एकाने चक्क सोशल मीडियावर ‘बाळ विक्री’ असल्याची पोस्ट टाकली…

Updated:

MT

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बाळ दत्तक देण्याचा ऑनलाइन बाजार मांडत एकाने चक्क सोशल मीडियावर ‘बाळ विक्री’ असल्याची पोस्ट टाकली. विशेष म्हणजे आपल्या मेहुणीच्या जन्माला न आलेले बाळ विकून त्या पैशातून तिचे लग्न करण्यासाठी फेसबुकवर पोस्ट टाकण्याचा प्रताप वाळूज एमआयडीसीमध्ये राहणाऱ्या एकाने केला. या आक्षेपार्ह पोस्टची दखल घेत ‘सायबर क्राइम’ विभागाने आरोपी शिवशंकर तांगडे आणि त्याची मेहुणी निकिता खडसे यांना शोधून काढले. तांगडे याला शनिवारी (१८ एप्रिल) अटक करण्यात आली. दोघांविरुद्ध क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

स्वतःचे मूल नसलेल्या पालकांना बाळ दत्तक घेण्याचा पर्याय उपलब्ध आहेत, मात्र आई-वडील होण्याच्या भावनांचा फायदा उचलत शिवशंकर प्रमानंद तांगडे (वय ३०, मूळ रा. माळखेड, पोस्ट लवाळा, जि. बुलडाणा , सध्या रा. रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर) याने बाळ विक्रीची ‘फेसबूक’वर ‘पोस्ट’ टाकली. तांगडे याची मावस मेहुणी निकिता खडसे सात महिन्यांची गरोदर आहे. तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले. तिचे दुसरे लग्न करण्यासाठी बाळाचा जन्म झाल्यावर त्यांना हे बाळ विकायाचे होते. ही मंडळी यावरच थांबली नाही तर, त्यांनी ‘पीपल्स अॅडॉप्शन ग्रुप’मधून बाळ दत्तक घेऊ इच्छित व्यक्तींची नावे, मोबाइल क्रमांक मिळवले आणि त्यांच्या फेसबुकवर पोस्ट पाठवल्या. प्रत्येकाला बाळाची ऑफर देत पैशाची मागणी केल्याची यावेळी उघड झाले. सायबर विभागाने पोस्ट तपासल्या. त्यावेळी शिवशंकर तांगडे यानेच पोस्ट टाकल्याचे दिसून आले. बाल न्याय अधिनियम २०००अंतर्गत तांगडेविरुद्ध जिल्हा महिला बालविकास अधिकारी हर्षा देशमुख यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी शिवकुमार तांगडे याला एमआयडीसी वाळूज परिसरातून अटक केली. पोलिस निरीक्षक गीता बागवडे अधिक तपास करत आहे.

छत्तीसगडमधील महिलेच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघडकीस

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai Indians: IPL 2021: मुंबई इंडियन्सने या अनुभवी खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या संपूर्ण यादी – ipl 2021 mumbai indians released lasith malinga...

नवी दिल्ली: IPL 2021 आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणारे तसेच विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाने या वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रिटेन आणि रिलीझ...

रिया चक्रवर्ती: वांद्र्यात फुलं विकत घेताना दिसली रिया चक्रवर्ती, यूझर म्हणाले- ‘सुशांतच्या वाढदिवसाचा ड्रामा सुरू झाला’ – rhea chakraborty requested to not follow her

मुंबई- सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर बर्‍याच आरोपांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ती वांद्रे येथे सर्वसामान्यांप्रमाणे...

jalgaon district: ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा; ५ जणांची कारागृहात रवानगी – collector take action against gram sevaks in jalgaon district

म. टा. प्रतिनिधी, जळगावः पदभार सोडूनही ग्रामपंचायतीचे दप्तर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ८ ग्रामसेवकांना ही दप्तर दिरंगाई चांगलीच महागात पडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी...

Recent Comments