Home शहरं औरंगाबाद aurangabad News : पोलिस निरीक्षकासह आठ जणांना संसर्ग - eight people, including...

aurangabad News : पोलिस निरीक्षकासह आठ जणांना संसर्ग – eight people, including a police inspector, were infected


म. टा. प्रतिनिधि, औरंगाबाद

औरंगाबाद शहर पोलिस दलात देखील करोना विषाणूने शिरकाव केला आहे. पोलिस दलात मुख्यालयातील एका निरीक्षकासह विविध पोलिस ठाण्यांच्या आठ जणांना ‘करोना’चा संसर्ग झाला आहे. यांच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, एक कर्मचारी करोनामुक्त झाल्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस मुख्यालयातून देण्यात आली.

करोनाबाधितांमध्ये मुख्यालयातील एक पोलिस निरीक्षक, जिन्सी पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी, पोलिस मुख्यालयातील एक पुरुष कर्मचारी, दोन महिला कर्मचारी, वेदांतनगर, वाहतूक शाखा आणि वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या ‘करोना पॉझिटिव्ह’ रुग्णांवर महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजनेंतर्गत शासकीय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यापैकी एक रुग्ण करोनामुक्त झाला असून, त्याला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले असून, ‘होम क्वारटाइंन’ करण्यात आले आहे. या बाधित कर्मचाऱ्यांच्या हॉस्पिटलला पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त मीना मकवाना यांनी भेट देऊन डॉक्टरांच्या पथकांशी चर्चा केली. त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यात आला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजवानाता सर्व सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन पोलिस मुख्यालयातून करण्यात आले आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

virat kohli: IND vs ENG : सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितली कोणाकडून झाली मोठी चुक… – ind vs eng : after winning 3rd test match...

अहमदाबाद, IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली,...

corona latest updates: coronavirus in maharashtra updates: आजही नव्या करोनारुग्णांच्या संख्येत ८ हजारांहून अधिक वाढ – coronavirus latest updates maharashtra registers 8702 new covid...

हायलाइट्स:आज दिवसभरात तब्बल ८ हजार ७०२ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ८ हजार ८०७ इतकी होती. तर, आज ३...

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कारमध्ये स्फोटके आढळल्याने खळबळ – abandoned car near mukesh ambanis residence antilia triggers bomb scare

हायलाइट्स:मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या.कंबाला हिल भागातील अँटिलिया टॉवरजवळ पोलीस बंदोबस्त वाढवला.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनेची घेतली गंभीर...

Recent Comments