Home शहरं औरंगाबाद aurangabad News : फक्त ‘होम डिलिव्हरी’ - 'home delivery' only

aurangabad News : फक्त ‘होम डिलिव्हरी’ – ‘home delivery’ only


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरात करोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने २० मेपर्यंत ‘लॉकडाऊन’ची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार आरोग्यविषयक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद असतील. घरपोच सेवा देणाऱ्या भाजी-पाला, फळे, दूध आणि किराणा सामान या सुविधा फक्त सुरू असतील.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून शासनाने ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला, पण त्याला न जुमानता औरंगाबाद शहरात भाजी-पाला, किराणा सामान खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळेच संसर्ग वाढत असून, त्यातूनच रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सूचनेनुसार महापालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी २० मेपर्यंत कड़क ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी करण्यासाठी सोमवारी (१८ मे) सकाळी आदेश जारी केले. अगोदरचे आदेश १७ मे रोजी रात्री १२पर्यंत होते. त्यात सुधारणा करून १७ मे रोजी रात्री १२पासून २० मे रोजी रात्री १२पर्यंत शहरात ‘लॉकडाऊन’ची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. या ‘लॉकडाऊन’च्या काळात घरपोच दूध, भाजीपाला, किराणा साहित्य पुरवण्यास मुभा देण्यात आली आहे. या ‘लॉकडाऊन’च्या परिणामाचा आढावा २० मे रोजी घेतला जाणार असून, त्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाणार आहे. पुन्हा शहरात सम-विषम पद्धत अवलंबली जाऊ शकते, असे मानले जात आहे.

‘ लॉकडाऊन’च्या सुधारित आदेशातील तरतुदी

– अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची वाहनांची वाहतूक बंद असेल

– अत्यावश्यक सेवेतही चारचाकी वाहनात चालक सोडून दोघांना परवानगी

– महा पालिका क्षेत्रातील सर्व मॉल, व्यापारी संकुले, बाजारपेठा बंद राहतील

– औषधी, वैद्यकीय उपचाराची उपकरणे देणाऱ्या सेवांची दुकाने सुरू राहतील

– सरकारी कार्यालयांत ३३ टक्के कर्मचारी उपस्थितीला परवानगी

– सुधारित शासन आदेशानुसार अडकलेले मजूर, प्रवाशांना येण्या-जाण्यास मंजुरी

– तात्पुरते बैठे भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने सुरू करण्यास मनाई

– घरपोच भाजीपाला, फळे, दुधाचा पुरवठा करण्यास शेतकऱ्यांना परवानगी

– सर्व प्रकारची मालवाहतूक, रिकामी जड वाहने, ट्रक यांना वाहतुकीस परवानगीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

West bengal: राष्ट्रीय आणि प्रादेशिक – editorial on the assembly elections in four states and one union territory

चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये देशातली कोणतीही निवडणूक ही साऱ्या देशाचे राजकीय तापमान...

offsite atms: पुण्यात यापुढं फक्त बँकेच्या शाखेजवळच ATM सुविधा? – most of banks have decided to close offsite atm centres in pune

पुणे: बँकांच्या शाखांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी असणारी 'एटीएम' केंद्रे (ऑफसाइट एटीएम) बंद करण्याचा निर्णय बहुतांश बँकांनी घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. शॉपिंग...

Narendra Modi Took His First Dose Of Covid 19 Vaccine At Aiims Delhi – लसीकरणाचा दुसरा टप्पा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस...

हायलाइट्स:देशभरात करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवातपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली लस६० वर्षांहून अधिक वयाच्या किंवा गंभीर आजारांशी झुंज देत असणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या...

Recent Comments