Home शहरं औरंगाबाद aurangabad News : फसविणाऱ्याची कोठडी वाढविली - extended the fraudster's cell

aurangabad News : फसविणाऱ्याची कोठडी वाढविली – extended the fraudster’s cell


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खेळणी विक्रेत्या घाऊक व्यापाऱ्याशी हातमिळवणी करून मालकालाच ४५ लाख ६९ हजार 8८९रुपयांना गंडा घालणाऱ्या नोकराच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत (२६ जून) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. यू. न्याहारकर यांनी गुरुवारी (२५ जून) दिले. दत्तप्रसाद सुभाषचंद्र लोया (४०, रा. बालाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

समर्थनगरातील सचिन सुगनचंद चितलांगी यांचे गुलमंडी भागात चितलांगी गिफ्ट व टॉइज, एल. आर. चितलांगी व वैष्णवी फन अशा तीन दुकाने आहेत. या तिन्ही दुकानांचे व्यवहार सचिन स्वत: सांभाळतात. त्यांच्या दुकानात २०१४पासून दत्तप्रसाद हा नोकर म्हणून कामाला होता. जवळचा नातेवाईक असल्याने सचिन यांचा त्याच्यावर विश्वास होता. दुकानातील महत्त्वाच्या कामकाजाशिवाय हिशेब व आर्थिक व्यवहार देखील तो पहायचा. सचिन यांच्यामार्फतच दत्तप्रसादची न्यू कुणाल गिफ्ट्स अँड टॉइज याचा मालक पंकज खंडेलवाल व त्याचा नोकर रवी पानखेडे याच्याशी ओळख झाली. त्यानंतर तिघा आरोपींनी २०१६ ते २०१९ यादरम्यान चितलांगी यांना ४५ हजार ६९ हजार ८९ रुपयांना गंडा घातला. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, आरोपी दत्तप्रसाद लोया याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपी दत्तप्रसाद लोया व पंकज खंडेलवाल यांनी बनावट बिले कोठे तयार केली. फसवणूक करून मिळवलेली रक्कमेपैकी आरोपीच्या वाट्याला आलेली रक्कम किती व आणखी कोणीसाथीदार आहेत का याचा तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सय्यद शहेनाज यांनी न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत कोठडी सुनावली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: हटवादीपणा सोडा – maharashtra times editorial on farmers protest in delhi and central government

धटासी आणावा धट। उद्धटासी उद्धट।खटनटासी खटनट। अगत्य करीं।समर्थ रामदास स्वामींच्या राजकारण निरुपणातील या समासाची प्रचीती गेले दोन महिने नवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या...

Coronavirus in Maharashtra Latest News: Coronavirus: राज्याची करोनामुक्तीच्या दिशेने पावले; ‘ही’ आकडेवारी देतेय मोठे संकेत – maharashtra reports 2779 new covid 19 cases 3419...

मुंबई: राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २ हजार ७७९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ३ हजार...

aurangabad man get jailed for molestation case: विनयभंग करणाऱ्याला वर्षभर कारावास – 40 years man get one year jailed for molestation in nashik

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादचहा टपरी चालविणाऱ्या महिलेला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला एक वर्षे कारावास आणि विविध कलमांखाली ५० हजार रुपयांचा...

Recent Comments