Home शहरं औरंगाबाद aurangabad News : ‘फाइट अगेन्स्ट करोना’ ही लोकचळवळ व्हावी - 'fight against...

aurangabad News : ‘फाइट अगेन्स्ट करोना’ ही लोकचळवळ व्हावी – ‘fight against karona’ should be a people’s movement


Unmesh.deshpande@timesgroup.com

Tweet : @UnmeshdMT

औरंगाबाद : करोना विषाणू संसर्गाचा आजार आता ‘पब्लिक’मध्ये आला आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यासोबतच जगावे लागणार आहे. जगण्यासाठी ‘फाइट अगेन्स्ट करोना’ ही लोकचळवळ झाली पाहिजे, अशी अपेक्षा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.

‘मटा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी, ‘लॉकडाऊन’ उठविल्यानंतरची परिस्थिती, गेल्या काही दिवसांत रुग्ण संख्येत होत असलेली वाढ, रुग्णवाढ रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपाययोजना, याबद्दल त्यांनी माहिती दिली.

आस्तिककुमार पांडेय म्हणाले, ‘शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. आम्ही त्याचे पालन करीत आहोत. ‘करोना’चा आजार होता आणि तो राहणार आहे. तीन महिन्यांपूर्वीची स्थिती आजही कमी-अधिक प्रमाणात तशीच आहे. गेल्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. रुग्णवाढीचे प्रमाण मर्यादित असावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. करोना संसर्ग आता लोकांपर्यंत आला आहे. त्यामुळे ‘फाइट अगेन्स्ट करोना’ ही आता लोकचळवळ झाली पाहिजे. या चळवळीत सुरक्षित वावर, मास्कचा वापर व वारंवार हात धुणे या तीन गोष्टी आपण कटाक्षाने पाळल्या तर ‘न्यू नॉर्मल’ जीवन आपल्याला जगता येणार आहे”

जवळपास तीन महिने संपूर्ण देश आणि राज्य ‘लॉकडाऊन’मध्ये होते, असे सांगताना प्रशासक पांडेय म्हणाले, ‘कायम लॉकडाऊन ठेवता येणार नाही. तीन महिन्यांत करोना रुग्णवाढीचे प्रमाण कमी ठेवण्यात आपल्याला यश आले आहे. ‘लॉकडाऊन’ करून सगळी अर्थ व्यवस्था बंद करून ठेवली तर त्यामुळे होणारी हानी ‘करोना’च्या आजारामुळे होणाऱ्या हानीपेक्षा जास्त असेल. त्यामुळे शासनाने ‘लॉकडाऊन’ उठवले आहे. प्रशासन म्हणून आम्ही त्याचे पालन करीत आहोत. ‘लॉकडाऊन’ उठवल्यानंतरच्या काळात प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळल्यास ‘न्यू नॉर्मल’ जीवन जगता येणे शक्य आहे.

Bरुग्णांना वाचविण्यावर भरB

कोविड पॉझिटिव्ह असणे म्हणजे आजारी असणे, असा त्याचा अर्थ नाही, असे सांगून पांडेय म्हणाले, ‘कोविड पॉझिटिव्ह असणे आणि त्याला ‘कोविड’ची लक्षणे असणे म्हणजे तो व्यक्ती आजारी आहे, असे मानले जाते. त्याला योग्य उपचार देऊन बरे करणे यावर. आता लक्ष केंद्रित केले जात आहे. करोना रुग्णवाढीचे प्रमाण कमी करणे याला आता प्राधान्य दिले जाणार आहे. यापूर्वीचे रुग्ण झोपडपट्टी भागात किंवा दाट लोकवस्तीच्या भागात आढळून येत होते. आता मध्यमवर्गीय व उच्चभ्रू वसाहतीत ‘करोना’चे रुग्ण आढळत आहेत. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात, आहेत असे पांडेय यांनी सांगितले. मुंबई, पुणे या शहरातून आपल्या शहरात येणाऱ्यांना ‘होम क्वारंटाइन’ केले जात आहे. त्यांनी देखील ‘होम क्वारंटाइन’चा नियम काटेकोरपणे पाळला पाहिजे.’ सध्या सुमारे एक हजार व्यक्ती उपचार घेत आहेत. त्यापैकी ७०० जण करोना संसर्गाची लक्षणे नसलेले आहेत. ३०० व्यक्ती ‘करोना’ची लक्षणे असलेल्या आहेत. त्यांना योग्य उपचार देऊन त्यांचे प्राण वाचवणे याला येत्या काळात प्राधान्य दिले जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आजचं राशीभविष्य… दिनांक ३१ ऑक्टोबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० Source link

Mumbai local: मोबाइल नाही तर लोकलप्रवास नाही ? – local passengers association ask question to state government over mumbai local entry

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनापूर्व काळात भिन्न आर्थिक स्थिती असलेले ८० लाख प्रवासी लोकलमधून प्रवास करत होते. यापैकी सगळ्यांकडेच अँड्राइड मोबाइल व इंटरनेटचे महागडे...

Recent Comments