Home शहरं औरंगाबाद aurangabad News : बंद असेलेले गॅरेज झाले सुरू - the closed garage...

aurangabad News : बंद असेलेले गॅरेज झाले सुरू – the closed garage started


…Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bगेल्या दोन महिन्यांपासून करोनाविरोधात लढणारे डॉक्टर आणि इतर करोना योद्धांच्या गाड्यांची दुरुस्ती करण्यासाठी शहरातील शो-रूमधील वाहन दुरुस्ती केंद्र आणि गॅरेज बुधवारी सुरू करण्यात आले.

लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या घरीच उभ्या होत्या. मात्र, रस्त्यावर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस, अन्य विभागाचे कर्मचारी यासह पॅरामेडिकल स्टॉफचे कर्मचारी नियमित कामावर होते. यातील अनेक जणांच्या गाड्यांमध्ये बिघाड झाल्याने त्यांना कर्तव्यावर जाण्याची अडचण होती. यामुळे शासनाच्या निर्देशानुसार शहरातील वाहन विक्रीच्या शोरूममधील वाहन दुरुस्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे. या शिवाय शहरातील गॅरेजसह अन्य आवश्यक दुकानेही उघडण्यात आले आहेत. सध्या या नवीन वाहन विक्रीच्या शोरूममध्ये वाहन दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. वाहन विक्रीची प्रक्रिया ही पाच जूनपासून सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, याबाबत जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्त यांच्याकडून कोणतेही आदेश नसल्याने सध्या विक्री केंद्र सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय शोरूम चालकांनी घेतलेला नाही. शहरातील वाहन शो रूम चालकांनी वाहन दुरूस्ती केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी शासनाच्या निर्देशानुसार कमी कामगार बोलविण्यात आले आहेत. तसेच सुरक्षित वावराचा नियम पाळण्यात येत आहे.

करोना लढयात मागील दोन महिन्यांपासून लोकांचा जीव वाचविणाऱ्या डॉक्टरसह अन्य कर्मचाऱ्यांच्या गाडया दुरुस्त व्हाव्यात. यासाठी शासनाच्या निर्देशानुसार वाहन दुरूस्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे.

B- मनीष धूत, मालक, वाहन विक्री एजन्सी

B

दुचाकी वाहन सध्यासाठी महत्त्वाचे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे सर्व्हिसिंग झालेली नाही. त्यामुळे नागरिकांची सोय वायी म्हणून वाहन दुरुस्ती केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.

B- राहुल मिश्रीकोटकर, मालक, वाहन विक्री एजन्सी BSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sensex today: शेअर बाजार ; सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी वधारले – sensex nifty gain today

मुंबई : सकाळच्या सत्रात ४०० अंकांची झेप घेणारा सेन्सेक्स दिवसअखेर १६३ अंकांच्या वाढीसह स्थिरावला. तो ४०७०७ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी...

Bombay high court: डॉक्टरला मारहाण; एक लाखाचा दंड – beating the doctor; a fine of one lakh

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः ‘करोनाचे संकट निर्माण झाल्यानंतर लॉकडाउन काळात सर्व लोक घरात असताना डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जवळच्या लोकांपासून दूर...

Recent Comments