Home शहरं औरंगाबाद aurangabad News : ‘बजाज ऑटो’मधील उत्पादन सुरू राहणार - production at bajaj...

aurangabad News : ‘बजाज ऑटो’मधील उत्पादन सुरू राहणार – production at bajaj auto will continue


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करोना विषाण संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक काळजी घेत सर्व नियमांचे पालन करत बजाज अटो लिमिटेडच्या वाळूज प्रकल्पात काम सुरू आहे. वाळूज प्रकल्पात ८१००हून अधिक अधिकारी, कामगार, कंत्राटी कामगार आहेत. अलिकडच्या काळात करोनाबाधित १४० रुग्ण आढळून आले. हे प्रमाण दोन एकूण मनुष्यबळाच्या दोन टक्क्यांहून कमी आहे. आरोग्यविषयक दक्षता घेत वाळूज बजाजचा प्रकल्प सुरु राहणार आहे, असे बजाज अटो लिमिटेडचे सीएचआरओ रवीकिरण रामासामी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

वाळूजमधील बजाज अटो कंपनी करोनामुळे बंद राहणार असल्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात स्पष्टीकरण देताना रामासामी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की आमच्या प्रकल्पामधील उत्पादन सुविधा ‘नॉर्मली फंक्शनिंग’ असणार आहे.

२४ एप्रिल रोजी लॉकडाऊन काळात नियम व अटींच्या अधीन राहून वाळूज प्लँट सुरू झाला. स्वच्छता, आरोग्यतपासणी, सॅनिटायझर, सुरक्षित वावरणे आणि सरकारने दिलेल्या नियम व अटींच्या अधीन राहून दैनंदिन उत्पादन सुरू झाले. आमच्या कंपनीतील अंतर्गत सुरक्षारक्षक आणि वैद्यकीय पथकाकडून नियमितपणे तपासणी केली जाते. सहा जूनपर्यंत आमच्याकडे करोनाबाधित आढळून आला नी. एक जूननंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर देशभरात सर्वत्र करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यात उद्योग, संरक्षण, पोलिसयंत्रणा, माध्यमे, सरकारी संस्थांचा समावेश आहे. सहा जून रोजी आम्ही करोनाबाधित रुग्णाची नोंद कळविली. त्यानंतर लगेचच टेस्ट, संपर्कशोध, सेल्फ आयसोलेशन, प्लँटची संपूर्ण स्वच्छता ‘प्रोटोकॉल’प्रमाणे केली. त्याचा अहवाल संबंधित यंत्रणेला वेळोवेळी सादर केला आहे. करोनाबाधित कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरविली जात आहे. करोनासोबत जगताना आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून प्रकल्प सुरू ठेवण्यात येत आहे. कंपनी बंद ठेवली तर कामगार, कर्मचारी; तसेच ‘सप्लाय चेन’वर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.

बजाज दोन दिवस बंद?

दरम्यान, बजाज ऑटोच्या स्थानिक व्यवस्थापनाने शनिवार व रविवार दोन दिवस वाळूज प्रकल्प बंद राहणार असल्याचे शुक्रवारी (२६ जून) दुपारी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले. त्यामुळे नेमकी कंपनी दोन दिवस बंद राहणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 31 जानेवारीला राज्यसभा नेत्यांची बैठक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स Source link

motorola edge s launched in china: ६ कॅमेऱ्याचा मोटोरोलाचा आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत – snapdragon 870, six cameras motorola edge s...

नवी दिल्लीः Motorola ने सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Motorola Moto G 5G नंतर आपला फ्लॅगशिप मोबाइल Motorola Edge S सुद्धा लाँच केला आहे....

Mumbai Azad Maidan Morcha: Pravin Darekar: शेतकरी मोर्चात भेंडी बाजारातील महिला कशा?; ‘या’ नेत्याचा सवाल – women from bhendi bazaar participated in azad maidan...

मुंबई: दिल्लीतील शेतकरी आंदोलन व प्रजासत्ताक दिनाच्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दिल्लीतील आंदोलनावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर...

Recent Comments