Home शहरं औरंगाबाद aurangabad News : भरचौकात तरुणाचा चाकूने भोसकून खून - a young man...

aurangabad News : भरचौकात तरुणाचा चाकूने भोसकून खून – a young man was stabbed to death in bharchowk


वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी येथे पूर्ववैमनस्यातून एका ३१ वर्षाच्या युवकाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना रविवारी (१७ मे) दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली. योगेश पंढरीनाथ प्रधान (रा. निरंकारनगर, वडगाव कोल्हाटी), असे त्याचे नाव

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश प्रधान येथील आण्णाभाऊ साठे चौकातून स्कुटीवरून (एम एच २० ई एम ८२४६) वरून जात असताना चौघांनी चाकूने वार करून दगडांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे योगेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. याची माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या नातेवाईकांनी योगेशला प्रताप चौकातील एका खासगी रुग्णालयात नेले, मात्र त्यांनी उपचार करण्यास नकार दिल्याने मोरे चौकातील एका रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घाटी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मृत घोषित केले.

मृत योगेश व आरोपी यांच्यात आठ महिन्यापूर्वी भांडण झाले होते. यावेळी राजू दहातोंडे याने योगेश विरुद्ध पोलिसात तक्रार दिली होती. तेव्हापासून राजू दहातोंडे व योगेश प्रधान यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. रविवारी योगेश घरी असतांना विशाल फाटे उर्फ मड्या हा घरी आला व त्याने योगेशला जितू दहातोंडेला फोन करण्यास सांगितले. त्यावरून योगेशने जितू दहातोंडे यास फोन केला. योगेश व जितू दहातोंडे यांचे फोनवरच भांडण झाले. त्यानंतर थोड्या वेळाने विकास गायकवाड व जितू दहातोंडे हे दुचाकीवरून योगेशच्या घरासमोर आले व त्यांनी त्याला बाहेर बोलावून चौकात चल तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून सोबत गेले. साठे चौकात हा प्रकार घडला.

या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गणेश प्रधान यांच्या फिर्यादीवरून विकास गायकवाड, जितू दहातोंडे, विशाल फाटे उर्फ मड्या व करण साळे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि विजय घेरडे हे करत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik corona update: Coronavirus : नाशिक जिल्ह्यात ३२४ नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू – nashik reported 324 new corona cases and 3 deaths in yesterday

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यात करोना संशयितांची संख्याही वाढत असून, तब्बल १,२४८ अहवाल प्रलंबित म्हणजेच रांगेत आहेत. शुक्रवारी ३२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले...

coronavirus in aurangabad: जेवणास विलंबामुळे करोनाबाधित रस्त्यावर – corona patients came to road due to they not getting lunch in aurangabad

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना महापालिकेतर्फे चहा-नाष्टा व जेवण दिले जाते. किलेअर्क येथील कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी दुपारचे जेवण...

Recent Comments