Home शहरं औरंगाबाद aurangabad News : भावांवर कुऱ्हाडीने वार; आरोपींना जामीन - attack the brothers...

aurangabad News : भावांवर कुऱ्हाडीने वार; आरोपींना जामीन – attack the brothers with an ax; bail to the accused


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबादB

शेतात येण्या-जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावरून दोघा भावांवर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणात सात आरोपींपैकी चौघांना नियमित तर तिघांना अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. साळुंके यांनी मंजूर केला. प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचक्यासह अटी व शर्तींवर आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला.

गोपीचंद सखाराम शिंदे (५९), विष्णू कचरू कान्हेरे (४८), संभाजी गोपीचंद शिंदे (२७) व कल्याण रामकीसन कान्हेरे (१९, सर्व रा. शरणापूर, ता. जि. औरंगाबाद) या आरोपींना नियमित जामीन तर नितीन कान्हेरे, विष्णू शिंदे आणि मच्छिंद्र कान्हेरे या आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात तुकाराम असाराम कान्हेरे (३५, रा. शरणापूर) यांनी तक्रार दिली. शेतात येण्या-जाण्याच्या रस्त्यावरून आरोपी रामकिसन कचरू कान्हेरे, उद्धव गोपीचंद कान्हेरे, नितीन विष्णू कान्हेरे, गोपीचंद शिंदे, विष्णू कान्हेरे, संभाजी शिंदे व कल्याण कान्हेरे यांनी तुकाराम कान्हेरे व त्यांच्या भाऊ ज्ञानेश्वर या दोघांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. तर आरोपी गोपींचद शिंदे व विष्णू कान्हेरे या दोघांनी त्यांच्या छातीवर व दंडावर कुऱ्हाडीने वार केले. उर्वरित आरोपींनी लोखंडी गजाने शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणात दौलतबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गोपीचंद शिंदे, विष्णू कान्हेरे, संभाजी शिंदे व कल्याण कान्हेरे या चार आरोपींना अटक केली होती. तर न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर चारही आरोपींनी नियमित जामीनासाठी तर गुन्ह्यातील उर्वरित तीन आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर केले होते. या प्रकरणात सातही आरोपींच्या वतीने अभयसिंह भोसले यांनी काम पाहिले. त्यांना शार्दुल शिंदे आणि दीपक पाटील यांनी सहाय्य केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Recent Comments