Home शहरं औरंगाबाद aurangabad News : …मजुरांची वाहतूक करणारी जड वाहने जप्त - प्त seizure...

aurangabad News : …मजुरांची वाहतूक करणारी जड वाहने जप्त – प्त seizure of heavy vehicles transporting laborers


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांना धोकादायक पद्धतीने नेणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन विभागाकडून देण्यात आलेले आहेत. अशा बेकायदा वाहनांमधून होणारी वाहतूक थांबविण्यासाठी ‘आरटीओ’चे पथक नेमण्यात आलेले आहे. या पथकामार्फत गेल्या दोन दिवसात १५च्यावर जड वाहने तसेच अन्य प्रकारची मालवाहू वाहने जप्त करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातून छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशासह पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. अनेक प्रवासी पायी निघाले आहेत, तर अनेक जण ट्रकमध्ये बसून प्रवास करत आहेत. मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रकला उत्तर प्रदेशात अपघात झाला. त्यानंतर राज्यातून मालवाहू वाहनांमधून प्रवासावर बंदी आणण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या पाच ठिकाणी आरटीओ कर्मचारी आणि अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

B१५ वाहनांवर कारवाई B

शरणापूर, गोलवाडी, हर्सूल टी पाइंट यासह अन्य दोन ठिकाणी कर्मचारी तैनात केले आहेत. या कर्मचाऱ्यांनी गेल्या ४८ तासांत १५ जड वाहने ताब्यात घेतली. या वाहनांमधून पुणे, मुंबईसह अन्य भागातून परप्रांतीय मजुरांना राज्याबाहेर सोडण्यात येत होते. ही सर्व वाहने जप्त करून औरंगाबाद आरटीओ कार्यालय, तसेच विविध पोलिस ठाणे आणि बस स्थानक परिसरात लावली आहेत, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांनी दिली.

………ट्रक चालकांवर गुन्हे दाखल होणार

संबंधित ट्रक चालकांवर मालवाहतूक वाहनांमधून अवैधरित्या प्रवासी वाहतूक करण्याचा गुन्हा किंवा दंडात्मक कारवाई सूचविण्यात आली आहे. तसेच सुरक्षित वावर नियम न पाळता प्रवाशांना घेऊन करोनासारखे आजार वाढविण्यासाठी मदत करण्याचा गुन्हाही संबंधित ट्रक चालकांवर दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

airtel ready to offer 5g: मस्तच! एअरटेलची ‘या’ शहरात 5G नेटवर्कची यशस्वी चाचणी – airtel ready to offer 5g with 4g bands, needs mid-band...

हायलाइट्स:एअरटेल या खाजगी टेलिकॉम कंपनीकडून ५जी रेडी नेटवर्कची घोषणा भारतातील हैदराबाद शहर ठरले सर्वात पहिले ५जी नेटवर्वकचे शहर ५जी नेटवर्कमुळे अवघ्या काही सेकंदात...

beed panchayat committee case: कथित २० कोटींचा गैरव्यवहार; हायकोर्टाचे आदेश – chief justice dipankar datta has directed present report over beed panchayat committee case

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबादबीड पंचायत समितीतील कथित २० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. पंचायत...

Recent Comments