Home शहरं औरंगाबाद aurangabad News : मासिआच्या अध्यक्षपदी हंचनाळ बिनविरोध - hanchanal unopposed as president...

aurangabad News : मासिआच्या अध्यक्षपदी हंचनाळ बिनविरोध – hanchanal unopposed as president of macia


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अग्रीकल्चर (मासिआ) या लघुउद्योगांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी २०२० -२१ साठी अभय हंचनाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मासिआची सर्वसाधारण सभा बुधवारी ज्ञानदेव राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने लागू केलेल्या अटींचे पालन करत ४० सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आणि उर्वरित सदस्यांना ऑनलाइन सहभागी करून घेऊन सभा घेण्यात आली. सचिव मनीष अग्रवाल यांनी मागील तिमाहीच्या कामकाजाचा आढावा घेतला. कोषाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी जमाखर्चाचा आढावा सादर केला. राजळे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती दिली. संघटनेचे माजी अध्यक्ष व निवडणूक अधिकारी बालाजी शिंदे यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.

चिकलठाणा व वाळूज विभागातून बिनविरोध निवडून आलेल्या २९ सदस्यांची नावे शिंदे यांनी जाहीर केली. २०२०-२१ साठी राजेंद्र चौधरी यांनी अभय हंचनाळ यांचे नाव सूचविले. त्यास राहुल मोगले यांनी अनुमोदन दिले. अन्य कुणाचे नाव समोर न आल्याने बालाजी शिंदे यांनी हंचनाळ यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. किरण जगताप यांनी आभार मानले.

Bनूतन कार्यकारिणी B

Bचिकलठाणा:B उपाध्यक्ष किरण जगताप, सचिव भगवान राऊत, सहसचिव विनय राठी, कोषाध्यक्ष बसवराज मोरखंडे, संपादक उद्योग संवाद राजेंद्र चौधरी, प्रसिद्धीप्रमुख सचिन गायके

Bवाळूज: Bउपाध्यक्ष नारायण पवार, सचिव राहुल मोगले, सहसचिव अब्दुल शेख, कोषाध्यक्ष विकास पाटील, सहसंपादक राजेश मानधनी, सह प्रसिद्धीप्रमुख सुमीत मालानी

सदस्य: मनीष अग्रवाल, विक्रम डेकाटे, सुदीप अडतिया, मनीष गुप्ता, संजय काकडे, सुरेश खिल्लारे, दिलीप निकम, कुंदन रेड्डी, ज्ञानदेव राजळे, अर्जुन गायकवाड, शरद चोपडे, गजानन देशमुख, अजय गांधी, संदीप जोशी, भीमराव कडावकर, अभिषेक मोदाणी, अनिल पाटील, सर्जेराव साळुंकेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

chandrakant patil: खडसेंबद्दल विचारताच चंद्रकांत पाटील म्हणाले… रात गयी, बात गयी! – bjp leader chandrakant patil on eknath khadse

पुणे: भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज बोलणं टाळलं. 'रात गयी,...

coronavirus vaccine news: Coronavirus vaccine करोना: ऑक्सफर्डची लस चाचणी अमेरिकेत पुन्हा सुरू होणार – coronavirus vaccine news astrazeneca oxford covid-19 vaccine trial resume in...

वॉशिंग्टन: अमेरिकेत पुन्हा एकदा ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस चाचणी सुरू होणार आहे. अमेरिकेत लस चाचणी सुरू करण्याबाबत नियामक मंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे. ब्रिटनमध्ये तिसऱ्या...

leopard spotted in malegaon: कळवाडी परिसरात पुन्हा बिबट्या; दोन दिवसांत २० जनावरांचा फडशा – leopards again spotted in kalwadi area malegaon

म. टा. वृत्तसेवा, मालेगावतालुक्यातील कळवाडी परिसरात जनावरांना पुन्हा एकदा बिबट्याने लक्ष्य केले आहे. गेल्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या तब्बल २० जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला....

Recent Comments