Home शहरं औरंगाबाद aurangabad News : मास्क, अंतर, स्वच्छता हीच त्रिसूत्री - mask, distance, cleanliness...

aurangabad News : मास्क, अंतर, स्वच्छता हीच त्रिसूत्री – mask, distance, cleanliness are the three principles


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

योग्य मास्क, अंतर व स्वच्छता याच त्रिसूत्रीच्या बळावर व तंतोतंत पालनातूनच प्रत्येक कार्यस्थळी करोनावर मात करणे शक्य आहे. त्यामुळे करोनाची भीती न बाळगता या त्रिसुत्रीच्या बळावर करोनाशी दोन हात करा आणि आपापल्या कामांचा पुनश्च हरिओम करा, असा मौलिक सल्ला वेगवेगळ्या तज्ज्ञांनी दिला आहे. तर, सकारात्मक व धीरोदात्त दृष्टिकोनातून प्रश्न सोडवण्यावर भर द्या, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे.

‘लॉकडाऊन’नंतर प्रत्येकजण आपापल्या उद्योग, व्यवसाय व नोकरीच्या ठिकाणी परतत आहे आणि काहीशा भय-शंका-कुशंका स्थितीत वावरत आहे. मात्र सर्व नकारात्मक बाबींना तिलांजली देत नेमकी व चपखल काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. हाच धागा पकडत फिजिशियन डॉ. विकास रत्नपारखे म्हणाले, ट्रिपल किंवा डबल लेयर मास्क लावून घराबाहेर पडतानाच सॅनिटायझरची बाटली सोबत घेण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक व्यक्तीपासून किमान सहा फूट अंतर राखले जाईल आणि काही झाले तरी स्वतःचा हात स्वतःचे डोळे, नाक, तोंड व चेहऱ्याला लागणार नाही, याची कठोर सवय लावून घ्या. त्यासाठी स्वतःच्या मनाला सतत प्रशिक्षित करा. लिफ्ट, गेट, दार, स्वच्छतागृह यासारख्या सार्वजनिक ठिकाणी हाताचा कुठेही स्पर्श झाला तर तात्काळ स्वतःचे हात सॅनिटाइज करा. कुठलीही खरेदी करताना सामानाची यादी करूनच बाहेर पडा व एकदाच सगळ्या वस्तू आणल्या जातील, याचा प्रयत्न करा. वस्तू खरेदी करतानाही प्रत्येकापासून किमान सहा फुटांचे अंतर राखले जाईल, यावर कटाक्ष ठेवा. खरेदीवेळी बिलाइतके पैसे देऊन मोकळे व्हा किंवा ऑनलाईन पेमेंट करा आणि सुटे पैसे वापस घेण्याच्या फंदात पडू नका. उरलेल्या पैशाची वस्तूही घेता येईल. प्रत्येक वेळी आपण गर्दीच्या ठिकाणी तर नाहीत ना, हा प्रश्न स्वतःला विचारा व त्यानुसार पुढचे पाऊल उचला, असेही डॉ. रत्नपारखे म्हणाले.

की-बोर्डसह सर्व वस्तू ‘सानिटाइज’ करा

कोणत्याही कार्यालयात किंवा प्रतिष्ठानमध्ये आल्यानंतर आपण स्वतः जेथे बसतो तो टेबल, कम्प्युटरचा की-बोर्ड, फोन व इतर वस्तू सॅनिटाइज करा. त्यासाठी टिश्यू पेपरवर सॅनिटायझर घेऊन सर्व वापराच्या वस्तू काम सुरू होण्याआधी पुसून काढा.च कार्यालयाची फरशी सोडियम हायपोक्लोराइडने स्वच्छ केलेली उत्तम. कार्यालयात कमीत कमी व्यक्ती असाव्यात आणि चेहऱ्यावर मास्क हवाच. काम आटोपल्यावर किंवा जेवणापूर्वी किंवा स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर हँडवॉश किंवा हात सॅनिटाइज करणे आवश्यक आहे. कार्यालयात खिडक्या-दार उघडे ठेऊन पंखा किंवा २५ ते २७ अंश तापमान राखले जाईल या प्रमाणे एसीचा वापर करता येईल. अर्थात, ‘एसी’चा वापर न केल्यास उत्तम व शक्यतोवर कार्यालयातील चपला तिथेच वापराव्यात. घरी आल्यावर कपडे बदलून स्वच्छ हात-पाय धुणे किंवा आंघोळ करणे उत्तम. कार्यालयात सॅनिटायझरची सोय नसेल तर स्वतः घरून घेऊन जाणे गरजेचे आहे, असेही फिजिशियन डॉ. आनंद देशमुख व डॉ. रत्नपारखे म्हणाले.

‘लॉकडाऊन’ हटवण्यात आला असला तरी करोनाचा विळखा सैल झालेला नाही. त्यामुळे मास्क वापरणे, अंतर राखणे, हात वेळोवेळी स्वच्छ करणे, सर्दी-खोकला असलेल्या व्यक्तीपासून लांब राहणे, घराबाहेर पडताना बेल्ट-घड्याळ यासारख्या वस्तुंचा वापर टाळणे आणि घरी आल्यावर आधी कपडे धुण्यासाठी बाजुला ठेऊन देणे व हँडवॉश करुनच घरात प्रवेश करण्याचे पथ्य पाळले पाहिजे.

– डॉ. संजय पाटणे, शहर अध्यक्ष, फिजिशियन्स असोसिएशन

करोनाच्या वाईट काळात मनःशांतीसह सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी शारीरिक व्यायाम, योगासने, ध्यानधारणा, उत्तम संवाद व प्रश्न सोडावण्याची वृत्ती-दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. भाविक असलेल्यांनी नामस्मरण करणे हाही उत्तम मार्ग आहे. मुळात करोनाचा फटका प्रत्येकाला काही ना काही प्रमाणात बसलेला आहे व आपण एकटे नाहीत, हे लक्षात घेऊन सारासार विवेक जागृत ठेवणे महत्वाचे आहे.

– डॉ. विनय बाऱ्हाळे, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rr vs csk live score: Chennai Super Kings vs Rajasthan Royals 37th Match IPL Live Cricket Score Updates From Sheikh Zayed Stadium – CSK...

अबुधाबी:IPL 2020 अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर आयपीएल २०२० मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (CSK vs RR)अशी लढत होत आहे. गुणतक्त्यात...

final year exams 2020: मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा संपल्या; दोन लाखांवर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा – mumbai university final year exams 2020 ended successfully, over...

Mumbai University Exams 2020: ऑक्टोबर- मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाच्या सर्व परीक्षा या वेळेत आणि सुरळीत पार पडल्या. दिनांक २५...

Recent Comments