Home शहरं औरंगाबाद aurangabad News : रिमझिम पावसाने शहर चिंब - the city is drenched...

aurangabad News : रिमझिम पावसाने शहर चिंब – the city is drenched in drizzle


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदा हवामान विभागाने राज्यासह मराठवाड्यात दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असून, त्याप्रमाणे जून महिन्यात प्रारंभीपासूनच पावसाने विभागात दमदार ‘एन्ट्री’ केली आहे. हे सातत्य सुरूच असून मंगळवारी औरंगाबाद शहरासह परिसराला पावसाने चिंब केले.

मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता शहराच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली. रिमझिम स्वरुपात असलेला हा पाऊस बराच वेळ सुरू होता. शहरात रिमझिम असलेल्या पावसाचा शहर परिसरात वेग मात्र अधिक होता. संध्याकाळी चार वाजेपासूनच शहरावर ढगांची गर्दी झाली. कडक्याच्या उन्हाचे रुपांतर सावलीत झाल्यामुळे पावसाची चिन्हे होतीच. तासाभरातच शहराच्या विविध भागामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली. शहराच्या सिडको, हडको, चिकलठाणा, मुकुंदवाडी, गारखेडा परिसर, सातारा परिसरात तसेच जुन्या शहराच्या बहुतांश भागामध्ये पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये पावसाचे सातत्य मराठवाड्यात राहणार आहे.

Bआठवडाभर रिपरीपB

जूनच्या पहिल्याच आठवड्यात मराठवाड्यातील जवळपास सर्व ७६ तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. येत्या आठवड्यामध्येही अशाच प्रकारचा पाऊस होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड व परभणी शहरामध्येही आठ जूनपर्यंत पाऊस दररोज हजोरी लावण्याचा अंदाज आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ms dhoni: महेंद्रसिंग धोनीने पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल… – indian former captain ms dhoni dance in a party, chennai super kings’...

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीला आपण सर्वच कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. त्यामुळे धोनीला आतापर्यंत कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही नाचताना पाहिले नसेल. पण धोनीचा एक...

Navi Mumbai Municipal Corporation: गुड न्यूज! ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही नाट्यगृहांना मिळणार भाडे सवलत – navi mumbai municipal corporation has decided take discount to...

मुंबई टाइम्स टीमगेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले नाट्यप्रयोग सुरू व्हावेत म्हणून नाट्यसृष्टीकडून विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या प्रयत्नांना...

Srinagar terror attack: Srinagar Terror Attack: महाराष्ट्राचा वीरपुत्र यश देशमुख काश्मिरात शहीद; धक्क्याने आई बेशुद्ध – yash deshmukh martyred in terrorist attack in srinagar

जळगाव: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील २२ वर्षीय जवान यश दिंगबर देशमुख हे शहीद...

Recent Comments