Home शहरं औरंगाबाद aurangabad News : रुग्णसंख्या वाढीमुळे फैलाव रोखणे शक्य - outbreaks appear to...

aurangabad News : रुग्णसंख्या वाढीमुळे फैलाव रोखणे शक्य – outbreaks appear to be exacerbated during this time


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र वाढणाऱ्या संख्येला घाबरण्याचे कारण नाही, तर रुग्ण सापडत आहेत हेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्यावर आपण तत्काळ उपचार करणे शक्य होत आहे. यामुळे आजाराचा फैलाव होण्यास आळा बसू शकतो,’ असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले.

औरंगाबाद शहर आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत करोना विषाणू फैलावाच्या परिस्थितीबद्दलते म्हणाले की, ‘आयसीएमआर’चे निर्देश ‘होम क्वारंटाइन’चे असले तरी अशा रुग्णांना व त्यांच्या नजिकच्या संपर्कातील सर्व व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचे आदेश मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली तरच करोनाचा फैलाव रोखता येईल. त्यामुळे साखळी तोडणे शक्य होणार आहे. संस्थात्मक क्वारंटाइन करतेवेळी शासानाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व आवश्यक कार्यवाही न करता निष्काळजीपणा केल्याचे निर्देशनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. ज्या रुग्णांना ‘होम क्वारंटाइन’ केले, त्या रुग्णांची नियमित तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. या लोकांनी घरीच राहणे आवश्यक आहे. मात्र अनेक लोक बाहेर फिरतात. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आढळत आहे, तसेच मृत्युदराबाबत केंद्रेकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी करोनाची लागण होण्याचा दर हा तुलनेत कमी होता. प्रशासन, आरोग्य विभाग उत्तम काम करत आहेत. मात्र आता ही लढाई लोकांना आपल्या हाती घ्यावी लागणार आहे. ‘गोल्डन थ्री डे’ म्हणजे लागण झाल्यानंतरचे तीन दिवस महत्त्वाचे आहेत, याच दिवसात तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. मात्र शहरातील बहुतांश मृत्यू हे वेळेत डॉक्टरांपर्यंत न आल्यामुळे झाले आहेत. एकूण मृत्युपैकी २७ रुग्णांचा मृत्यू ते रुग्णालयात दाखल झाल्याच्या १२ तासांच्या आत झाला. हा वेळकाढूपणा रोग्यांच्या जीवावर उठत आहे. त्यामुळे नागरिकांनी आजार लपवू नये, आजार अंगावर काढू नये, तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन केंद्रेकर यांनी केले.

Bपल्स ऑस्किमीटर, थर्मामीटर घ्या B

आपण महागडे मोबाइल, वाहने वापरतो, त्याप्रमाणे आता पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर प्रत्येकाच्या घरात असणे आवश्यक आहे, असे केंद्रेकर म्हणाले.

Bव्हिडिओ कॉलची व्यवस्था करणारB

रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक घाबरलेले आहेत, त्यांना धीर देणे आवश्यक असून त्यासाठी घाटी रुग्णालयात नातेवाईकांना रुग्णाशी संपर्क करता यावा यासाठी व्हिडिओ कॉलची सोय करण्याबाब निर्देश देण्यात आले असल्याचे केंद्रेकर यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

e vehicle may be delay due to corona: करोनाचे संकट; ई-वाहनांना लागणार ब्रेक – e-vehicles will be delayed

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन २०३० पर्यंत संपूर्ण देशात ई-वाहने रस्त्यांवर चालवली जातील, हा केंद्र सरकारचा संकल्प अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट...

Marathwada : २४ तासांत आढळले ५८५ नवे करोनाग्रस्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांच्या संख्या कमी होत असून, गुरुवारी (२३ ऑक्टोबर) विभागाातील आठही जिल्ह्यांत ५८६ नवीन बाधित आढळले...

Recent Comments