Home शहरं औरंगाबाद aurangabad News : वीज बिल फाडून मनसेचे आंदोलन - mns agitation by...

aurangabad News : वीज बिल फाडून मनसेचे आंदोलन – mns agitation by tearing up electricity bill


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाढीव वीज बिलाबाबत महावितरण विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी काही उपाय योजना केली जात नाहीत, असा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या दालनात विजेची बिले फाडून फेकून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणाचा निषेध केला; तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर वाढीव वीज बिलांबाबत आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुहास दाशरथे, सतनामसिंग गुलाटी आणि राजू खरे यांनी महावितरणाचे मुख्य कार्यकारी अभियंता भुजंग खंदारे यांच्याशी मंगळवारी (२४ नोव्हेंबर) भेट घेतली. या भेटीदरम्यान दाशरथे यांनी सर्वसामान्य वीज ग्राहकांना ‘लॉकडाऊन’च्या काळात वाढीव बिले आलेली आहेत. याबाबत महावितरण विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. महावितरणाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी वाढीव बिले तक्रारी दूर करण्यासाठी यापूर्वी मेळावे आयोजित करण्यात आलेले आहेत तर, आणखी काही तक्रारी असल्यास पुन्हा मेळावे आयोजित करून या समस्या दूर करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

महावितरण विभागाकडून असे मेळावे घेण्यात येत असतात. या मेळाव्यांमध्ये नागरिकांना दिलासाही मिळत नाही. ‘लॉकडाऊन’मुळे नागरिक हैराण आहेत. यामुळे मेळावे लावून नागरिकांची दिशाभूल करित असल्याचा आरोप करीत सुहास दाशरथे यांनी वाढीव वीज बिलाच्या तक्रारीसह वीज बिल फाडून मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्याकडे फेकून या घटनेचा निषेध व्यक्त केला. पोलिसांनी मध्यस्थी करून दाशरथे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना खंदारे यांच्या दालनातून बाहेर काढण्यात आले. यावेळी दाशरथे यांनी या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

औरंगाबाद: लाँकडाऊन मधील वाढीव वीज बिलाबाबत शासनाकडून कोणतीही सवलत जाहिर करण्यात आली नाही. नागरिकांना अवाजवी वीज बील दिल्या आरोप करित मनसेच्या पदाधिकारी यांनी मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या दालनात वीज बिल फाडून फेकत महावितरणाचा निषेध केला.( फोटो-चंद्रकांत थोटे.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sharad pawar on madhukar pichad: Sharad Pawar: गेल्या निवडणुकीत काहींच्या अंगात आलं होतं!; पवारांनी ‘या’ नेत्याची काढली पिसं – the behavior of some of...

नगर: ‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही नेत्यांच्या अंगात आले होते. त्यामुळे ते चमत्कारिक वागले. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली. मात्र, शेवटी...

Recent Comments