Home शहरं औरंगाबाद aurangabad News : वेदांतनगर ठाण्यातील फौजदाराला करोना….शहर पोलिसांमध्ये बाधीत रूग्णाचा आकडा पोहचला...

aurangabad News : वेदांतनगर ठाण्यातील फौजदाराला करोना….शहर पोलिसांमध्ये बाधीत रूग्णाचा आकडा पोहचला पंधरावर – the number of infected patients has reached 15 in the city police.


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bलॉकडाऊन बंदोबस्तात काम करणाऱ्या वेदांतनर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदाराला करोनाची लागण झाल्याचे शनिवारी समोर आले.

पोलिस आयुक्त कार्यालयाने शनिवारी जाहीर केलेल्या पोलिस दलातील करोना संशयित रुग्णाच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन आठवड्यात शहर पोलिस दलातील १२ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. यात वेदांतनगर येथील पोलिस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ही संख्या १३ वर पोहोचली आहे. या तेरा कर्मचाऱ्याशिवाय एटीएसमधील एक आणि अन्य विभागातील एक असे पंधरा जण बाधित झालेले आहेत. यापैकी शहर पोलीस दलातील तेरापैकी तिघे कोरोना मुक्त झाल्याने केवळ दहा पोलिसांवर उपचार सुरू आहेत. इतर विभागातील दोन कर्मचाऱ्यांवरही उपचार सुरू असल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी करोना पॉझिटीव्ह अहवाल आलेला वेदांतनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी हा शहरातील मध्यवस्तीत राहत आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शहर वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्याची लक्षणे दिसून होती. या अधिकाऱ्याचा शुक्रवारी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर परिवारातील सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले. या कुटुंबाचे स्वॅब घेण्यात आले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

raj thackeray: राज ठाकरेंवरील वॉरंट रद्द; पण ‘या’ कारणासाठी कोर्टात हजर राहण्याचे आदेश – vashi court orders raj thackeray to appear in court

हायलाइट्स:मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेशराज ठाकरेंवरील वॉरंट रद्द करण्यात आला आहे२०१४मधील टोल नाका प्रकरण नवी मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

opposition parties boycotting presidents address: ​कृषी कायद्यांना विरोध; संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार – farm laws 16 opposition parties that were boycotting presidents address

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या ( parliament budget session ) पहिल्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( president's address ) यांचे २९ जानेवारीला संसदेत...

Recent Comments