Home शहरं औरंगाबाद aurangabad News : व्यापाऱ्याचे घर फोडून पावणेदोन लाख लंपास - the trader's...

aurangabad News : व्यापाऱ्याचे घर फोडून पावणेदोन लाख लंपास – the trader’s house was burglarized


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bजाधववाडीतील नव्या मोढ्यांतील घराच्या छतावर झोपलेल्या व्यापाऱ्याचे दुकान फोडून चोरट्यांनी पावणेदोन लाखांचा ऐवज मंगळवारी पहाटे दोन ते चारच्या दरम्यान लंपास केला. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन मोंढा भागात गोरक्षनाथनगर ही वसाहत आहे. या ठिकाणी संजय घोलप यांचे किराणा दुकान आहे. रात्री जेवण केल्यानंतर सोमवारी घोलप कुटुंब छतावर झोपण्यासाठी गेले. पहाटे दोन ते चारच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या छताला लागून असलेल्या जिन्यावरून घरात प्रवेश केला. घरातील ऐवजाचा कपाट असलेल्या खोलीत चोरटे शिरले. कपाटाची चावी त्यांना तेथेच सापडल्याने चोरट्यांचे काम सोपे झाले. कपाटातील रोख पन्नास हजार रुपये आणी अडीच तोळ्याचे सोन्या – चांदीचे दागिने असा अंदाजे पावणेदोन लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. पहाटे घोलप कुटुंब खाली आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. चोरी झाल्याचे कळताच त्यांनी हर्सूल पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस, गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी रवाना झाली. श्वान पथकाने तपासणी करत घटनास्थळावरून बोटांचे ठसे घेण्यात आले.

Bलॉकडाऊनमध्ये चोरट्यांचे आवाहन

Bशहरात लॉकडाऊन आणी संचारबंदी लागू असतानाही चोरट्यांनी विविध ठिकाणी चोऱ्या करीत पोलिसांसमोर आवाहन निर्माण केले आहे. पाच दिवसांपूर्वी जालना रोड येथे एलईडीची शोरूम फोडून अकरा लाखांचा ऐवज लंपास केला. यापूर्वी पोलिसांचा पॉइंट असलेला महावीर चौक येथे मधू वाइन शॉप फोडून दारूचा साठा लंपास केला. जिन्सी भागातही चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Audio clip of Shiv Sena’s BMC corporator: पालिकेत सेना-भाजप संघर्ष – bjp corporators agitation against shivsena over audio clip of shiv sena’s bmc corporator...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढीस लागत असून, मुंबई पालिकेतही त्याचे पडसाद उमटत आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत...

ranjitsinh disale: वैश्विक शिक्षक : रणजितसिंह डिसले – india’s zp school teacher ranjitsinh disale wins 2020 global teacher prize

‘युनेस्को’ आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या ‘ग्लोबल टीचर’ या सन्मानासह सुमारे सात कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविणारे रणजितसिंह डिसले हे खऱ्या अर्थाने वैश्विक शिक्षक...

आजचं राशीभविष्य… दिनांक ०५ डिसेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक ०५ डिसेंबर २०२० Source link

Recent Comments