Home शहरं औरंगाबाद aurangabad News : शहरी भागात उद्यापासून लॉकडाऊनमध्ये सवलती - concessions in lockdown...

aurangabad News : शहरी भागात उद्यापासून लॉकडाऊनमध्ये सवलती – concessions in lockdown from tomorrow in urban areas


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या ६९ दिवसानंतर आता लॉकडाऊनमध्ये शहरी भागात सवलती देण्यात येणार आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये कंटेन्मेंट झोनची निश्चिती महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त, तर महापालिका हद्द वगळून जिल्हाधिकारी ठरवणार आहेत.

कंटेन्मेंट झोन हे रहिवाशी कॉलनी, मोहल्ला, झोपडपटटी, इमारत, इमारतीचा समूह, गल्ली, महापालिका वॉर्ड, पोलिस स्टेशनची हद्द, खेडेगाव, गांवाचा समूह, ग्रामपंचायतयांच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेची दुकानेच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिकांची ये-जा रोखण्यासाठी काटेकोर परिघीय नियंत्रण ठेवण्यात येणार असून या संदर्भात जिल्हा आणी शहरी पातळीवर संबंधित अधिकारी निर्णय घेणार आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ वैद्यकीय, आपत्कालीन सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठीच नागरिकांचे आवागमण चालू ठेवण्यात येणार आहे. याबाबतीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्या‍ण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करणे बंधनकारक आहे.

दरम्यान, शहर व जिल्ह्यासाठी ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कसे असेल, याबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आदेश जारी केले आहेत. शहरात महापालिका आयुक्त आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस आयुक्तांचे आदेश अंमलात राहणार आहेत. तर ग्रामीण भागात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांचे आदेश लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune: धक्कादायक! अंगावरील कपडे उतरवून तरुणाला बेल्टने मारहाण; व्हिडिओही काढला – 36 year old man abducted and beaten by belt in viman nagar pune

म. टा. प्रतिनिधी, पुणे: कर्जाची रक्कम परत न केल्याने तरुणाच्या अंगावरील कपडे उतरवून त्याला पट्ट्याने मारहाण केली. त्या मारहाणीचा व्हिडीओ काढून पैसे न...

nuh: haryana news: ४ मुली मृतावस्थेत आढळल्या, आई तडफडत होती; एका रात्रीत ‘असं’ काय घडलं? – haryana four girls found dead and woman injured...

नूह : हरयाणातील नूह जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील पिपरौली गावात चार मुली मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांचा गळा चिरला होता....

Mount Everest: खरंच भूकंपामुळे माउंट एव्हरेस्टची उंची कमी झाली ? नवी उंची जाहीर होणार – nepal and china to announce revised height of mount...

काठमांडू: नेपाळमध्ये २०१५ साली झालेल्या भूकंपानंतर जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची घटल्याचा दावा केला जात होता. या दाव्यात किती तथ्य...

Recent Comments