Home शहरं औरंगाबाद aurangabad News : शाळा सुरू करण्याची घाई नको - don't rush to...

aurangabad News : शाळा सुरू करण्याची घाई नको – don’t rush to start school


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bकरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता एक जुलैपासून शाळा सुरू कराव्यात. त्यासह मोफत प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्र तपासणीची प्रक्रिया शाळास्तरावरच पूर्ण करावी, अशी मागणी पालक संघटनेने केली आहे.

पालक संघाने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय हा चुकीचा ठरेल. शाळा सुरू केल्या तरी पालकांची विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची मानसिकता नाही. करोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे मुलांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. काही शाळांमध्ये एकाच वर्गात ६० ते ७० विद्यार्थी आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित वावर कसा पाळला जाईल, दुपारच्या जेवणाच्या वेळी सर्व मुले एकत्र जेवण करतात, अनेक शाळेत पाणी पिण्यासाठी एकच ठिकाण आहे, शहरांमध्ये अनेक विद्यार्थी रिक्षात किंवा इत वाहनांतून प्रवास करतात. त्या वाहनात कमी कमी सहा ते दहा विद्यार्थी एकत्र शाळेमध्ये ये-जा करतात. अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेमध्ये बसने प्रवास करतात. त्यामुळे शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा मुद्द्यांवर ही पालक संघाने प्रकाश टाकला आहे. त्यासह शिक्षण विभाग ज्या पद्धतीने ऑनलाइन शिक्षण देण्याच्या बाबतीत निर्णय घेत आहे, अशा प्रकारचे तंत्रज्ञान ग्रामीण भागात उपलब्ध नाहीत. याकडेही पालक संघांना लक्ष वेधले आहे.

Bमोफत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा

Bमोफत प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण न करता आपण शाळा सुरू करणे योग्य नाही. मोफत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न करता शाळा सुरू केल्यास या प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. शाळा सुरू केल्या तर अभ्यासक्रम पुढे जाईल मग हे दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश आपण केव्हा देणार, असा प्रश्नही पालक संघाने उपस्थित केला आहे.

शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने घाई करू नये. त्यासह मोफत प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. याबाबत कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया ही शाळास्तरावरच व्हायला हवी. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत राज्य सरकारने योग्य निर्णय घ्यावा.

B- प्रशांत साठे, अध्यक्ष, पालक संघBSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Uddhav Thackeray: काळजावर झालेली ‘ती’ जखम कधीही भरून येणार नाही: उद्धव ठाकरे – cm uddhav thackeray released coffee table book titled atulya himmat in...

मुंबई: '२६ नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. त्या दुर्दैवी घटनेला १२ वर्षे झाली, यापुढेही कित्येक वर्ष उलटतील, पण काळजावर झालेली...

diego maradona death: स्टार फुटबॉलपटू मॅरेडोना यांच्या निधनानं बॉलिवूड हळहळलं – srk, priyanka chopra, kareena kapoor khan and other celebrities mourn the loss of...

मुंबई : महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं काल म्हणजेच बुधवारी निधन झालं, ते ६० वर्षांचे होते. मॅराडोना यांचे ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचं वृत्त...

Pune crime news: २० वर्षांपासून मूल होत नसल्याने केले बाळाचे अपहरण; सख्ख्या बहिणींना अटक – Pune Hadapsar Police Arrested Two Womens For Kidnapping A...

म. टा. प्रतिनिधी, हडपसर: हडपसर येथील गाडीतळ परिसरातून अपहरण झालेले बाळ गुरुवारी सापडले. वीस वर्षांपासून मूल होत नसल्याने एक वर्षाच्या या बाळाला पळवून...

Recent Comments