Home शहरं औरंगाबाद aurangabad News : सर्वाधिक करोनाबाधित अठरा ते पन्नास वयोगटातील - the most...

aurangabad News : सर्वाधिक करोनाबाधित अठरा ते पन्नास वयोगटातील – the most coronated are between the ages of eighteen and fifty


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरात आतापर्यंत आढळलेल्या करोनाबाधितांपैकी १८ ते ५० या वयोगटातील व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे. याच व्यक्ती करोनावाहक असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे घराबाहेर वावरताना प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन केले जात आहे.

करोनाबाधित व करोनामुक्त व्यक्तीच्या बुधवारपर्यंतच्या (१० जून) महापालिकेकडून मिळेल्या माहितीनुसार, १८ ते ५० वयोगटातील १२३५ व्यक्ती करोनाबाधित आहेत. या वयोगटातील बाधिकांच्या संख्येबद्दल प्रशासनात चिंता होत आहे. या वयोगटातील व्यक्ती नोकरी, कामानिमित्त घराच्या बाहेर पडतात आणि करोनाबाधित होतात, असे लक्षात आले आहे. हा वयोगट करोनावाहक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बाहेरून आल्यानंतर त्यांच्या मार्फत घरातील ज्येष्ठांना बाधा होत आहे. १८ ते ५० वयोगटानंतर ५० व त्यापेक्षा जास्त या वयोगटातील बाधितांची संख्या आहे. बुधवारपर्यंत या वयोगटातील ५७३ जणांना करोनाची लागण झाली. पाच ते १८ या वयोगटातील २८३, तर शून्य ते पाच वयोगटातील ५६ जणांना लागण झाली आहे. बुधवारपर्यंतच्या पालिकेच्या नोंदीनुसार, २१६५ रुग्णांपैकी ९९ रुग्ण त्यापूर्वीच्या २४ तासांतील आहेत. या ९९ रुग्णांत १८ ते ५० व ५० पेक्षा जास्त या वयोगटातील प्रत्येकी ४७ जणांना करोनाची बाधा झाली. पाच ते १८ वयोगटातील चार, शून्य ते पाच वयोगटातील एकाला करोनाची लागण झाली.

३८२ क्वारंटाइन

पालिकेने ३८२ जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे. त्यापैकी कलाग्राममध्ये पाच, एमसीइडी वसतिगृह ४१, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ९२, हॉटेल मेनॉर दहा, विद्यापीठ वसतिगृह ८४, नवखंडा वसतिगृह ८८, महसूल प्रबोधिनीमध्ये चार जणांना ठेवले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

BSNL festive offer: BSNL युजर्ससाठी फेस्टिव सीजनमध्ये ऑफर्स, या रिचार्जवर बंपर फायदे – festive offer: bsnl extends validity of rs 1999, rs 699, rs...

नवी दिल्लीः बीएसएनएल कंपनीने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs)...

मास्क न लावणाऱ्यांमुळे वाढू शकतो करोनाचा धोका

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संसर्गवाढीच्या (उच्चतम बिंदू) महत्त्वाच्या टप्प्यावर मुंबई आली असल्याचे निरीक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वारंवार व्यक्त केले जात असले तरीही ...

Recent Comments