Home शहरं औरंगाबाद aurangabad News : सहा दिवस दुकाने बंद अडचणीचे - trouble closing shops...

aurangabad News : सहा दिवस दुकाने बंद अडचणीचे – trouble closing shops for six days


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करोनाच्या भीतीमुळे ५५ दिवसांपासून शहरात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने एक दिवसाआड खरेदीची मुभाही दिली होती. मात्र करोनाचे रुग्ण वाढत असल्याने आधी तीन व त्याला जोडून तीन दिवस, असे सलग सहा दिवसांची कडक संचारबंदी सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत अडचणीची ठरत आहे.

लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा जागोजागी स्वयंसेवी संस्थानी भोजन वाटप केले होते. कही संस्थांकडून अजूनही भोजन व रेशन वाटप सुरू आहे. पण, सहा दिवसांच्या कडक संचारबंदीमुळे अनेकांची मोठी अडचण झाली आहे. जुना बाजार येथील रहिवासी सयद सहाब उर्फ मामू व त्यांचा भाचा टेलर आहेत. यंदा रमजानचे काम नाहीच पण एक दिवसाआड बाजार उघडत असल्याने काही जुनी कपडे दुरुस्तीचे काम मिळत होते. हे काम आता बंद पडले आहे. फळविक्रेते रशीद शेख हे एक दिवसआड व्यवसाय करून उदरनिर्वाह करायचे. त्यांचाही रोजगार बंद झाला, शिवाय जवळ असलेला माल खराब होण्याची शक्यता आहे. गरीब लोक हातचे पैसे राखून ठेवत गरजेनुसार किराणा सामान आणत होते. ‘सुरक्षित अंतर ठेऊन बाजारापेठा काही वेळासाठी सुरू ठेवावा,’ अशी मागणी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष मोहसीन अहेमद यांनी मुख्यमंत्र्यांकडे ई-मेलद्वारे केली आहे. हे शक्य नसले, तर घरोघरी सामान व गॅस पुरवठा करावा, असे मेलमध्ये म्हटले आहे. या परिस्थितीत गरीब करोनापेक्षा भूकेने मरण्याची शक्यता आहे. याचा प्रशासनाने विचार करावा,असे एक नागरिक हिशाम उस्मानी यांनी सांगितले.

Bपाच किलो पीठ, तेल-मीठ द्याB

सिडको भागात राहणाऱ्या एक महिलेने दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या दिवसांपासून गल्ली बोळातील दुकाने बंद आहेत. काही खरेदी करता येत नाही, पोलिस घराबाहेर पडू देत नाहीत. घरात स्वयंपाक करण्यासाठीही सामान नाही. कसंही करा? पाच किलो पीठ, तेल-मीठ आणून द्या, अशी आर्त विनंती एक मदत करणाऱ्या व्यक्तीला केली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shiv sena vs bjp in bmc: शिवसेनेवरचा ‘हा’ आरोप भाजपला भलताच महागात पडला! – maha vikas aghadi parties hit the bjp over distribution of...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगेल्या वर्षीच्या विकासनिधीचा शिवसेनेकडून गैरवापर झाल्याचा आरोप भाजपलाच महागात पडला आहे. यंदाच्या विकासनिधी वाटपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि...

maharashtra budget 2021: राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता – maha vikas aghadi government trying to give concession in petrol and...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली असल्याने यातून राज्यातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकार...

THE NEW JIOPHONE 2021 OFFER: Reliance Jio चा नवा धमाका, ७४९ रुपयांत वर्षभर अनलिमिटेड कॉल आणि डेटा – jiophone 2021 offer announced with 2...

हायलाइट्स:रिलायन्स जिओची जबरदस्त ऑफर १ मार्च २०२१ पासून या ऑफरला सुरुवात होणार THE NEW JIOPHONE 2021 OFFER असे नाव नवीन आणि जुन्या ग्राहकांना...

Recent Comments