Home शहरं औरंगाबाद aurangabad News: सात करोनामुक्त; आणखी एकाला संसर्ग - seven tax-free; another infection

aurangabad News: सात करोनामुक्त; आणखी एकाला संसर्ग – seven tax-free; another infection


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील आणखी एक ३८ वर्षांच्या व्यक्तीला करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्याने शहर व जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३० झाली आहे. त्याचवेळी शहरातील सात करोनाबाधित रुग्णांचे १४व्या व १५व्या दिवशी घेतलेले स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे सर्व सात रुग्ण हे करोनामुक्त झाल्याचा सुखद धक्का आहे. सात करोनामुक्त व्यक्तींपैकी पाचजणांना रविवारी (१९ एप्रिल) जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर उर्वरित दोघा करोनामुक्त व्यक्तींना सोमवारी जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

शहर व जिल्ह्यातील एकूण ३० करोनाबाधितांपैकी आतापर्यंत दहा रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत तिघा करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दोन्ही स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या सात वर्षांच्या करोनामुक्त मुलीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यापूर्वी एक ५९ वर्षांची महिला व दुसरी ५८ वर्षांची महिला या करोनामुक्त झाल्यामुळे त्यांना अनुक्रमे खासगी रुग्णालयातून व जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. त्याचवेळी रविवारी सात करोनाबाधित रुग्ण हेदेखील करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातील पाच व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरित दोघांच्या काही चाचण्या पूर्ण करून त्यांनाही सोमवारी (२० एप्रिल) जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, करोनाबाधित बळंतिणीची व तिच्या चिमुकलीची प्रकृती उत्तम असून, चिमुकलीच्या लाळेचा स्वॅब; तसेच गर्भजल व योनीमार्गातील स्त्रावाच्या चाचण्यासुद्धा निगेटिव्ह आल्याने चिमुकलीला करोना विषाणुचा संसर्ग झालेला नाही, हेही स्पष्ट झाल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड विलगीकरण कक्षात एकूण १९ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

२९ रुग्णांचे घेतले स्वॅब

जिल्हा रुग्णालयात रविवारी एकूण ४६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातील २९ जणांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, दोन दिवसांतील एकूण ६४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून १७ व्यक्तींचे अहवाल येणे बाकी आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयात ४४ रुग्ण देखरेखीखाली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) कोव्हिड वॉर्डात २२ व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी १७ जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. पाच जणांचे स्वॅब येणे बाकी आहेत, असे घाटीचे नोडल अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे.

‘सारी’चे सहा रुग्ण दाखल

‘सारी’च्या सहा रुग्णांना रविवारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘कोव्हिड केअर सेंटर’मधून २७ व्यक्तींचे स्वॅब घाटीच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शहरातील ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये ५३५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे आणि १६ व्यक्तींचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

निवडणुकीचे मानधन न मिळाल्यानं शिक्षक संतापले – teachers from niphad did not get paymet of work in gram panchayat election

म. टा. वृत्तसेवा, निफाडतालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली, गावोगावचे कारभारी निवडले गेले, गुलाल उधळला गेला. मात्र या निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजासाठी झटणाऱ्या...

Recent Comments