Home शहरं औरंगाबाद aurangabad News: सात करोनामुक्त; आणखी दोघांना संसर्ग - seven tax-free; another two...

aurangabad News: सात करोनामुक्त; आणखी दोघांना संसर्ग – seven tax-free; another two infections


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील आणखी दोघांना करोना विषाणू संसर्ग झाला आहे. त्यापैकी एक रुग्ण ३८ वर्षांच्या असून, समतानगर परिसरातील रहिवासी आहे. दुसरा रुग्ण ५५ वर्षांच्या असून तो आरेफ कॉलनी भागातील रहिवासीआहे. शहर व जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३१ झाली आहे. त्याचवेळी शहरातील सात करोनाबाधित रुग्णांचे १४व्या व १५व्या दिवशी घेतलेले स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे सर्व सात रुग्ण हे करोनामुक्त झाल्याचा सुखद धक्का आहे. सात करोनामुक्त व्यक्तींपैकी पाचजणांना रविवारी (१९ एप्रिल) जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर उर्वरित दोघा करोनामुक्त व्यक्तींना सोमवारी जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

शहर व जिल्ह्यातील एकूण ३० करोनाबाधितांपैकी आतापर्यंत दहा रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत तिघा करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दोन्ही स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या सात वर्षांच्या करोनामुक्त मुलीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यापूर्वी एक ५९ वर्षांची महिला व दुसरी ५८ वर्षांची महिला या करोनामुक्त झाल्यामुळे त्यांना अनुक्रमे खासगी रुग्णालयातून व जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. त्याचवेळी रविवारी सात करोनाबाधित रुग्ण हेदेखील करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातील पाच व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरित दोघांच्या काही चाचण्या पूर्ण करून त्यांनाही सोमवारी (२० एप्रिल) जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, करोनाबाधित बळंतिणीची व तिच्या चिमुकलीची प्रकृती उत्तम असून, चिमुकलीच्या लाळेचा स्वॅब; तसेच गर्भजल व योनीमार्गातील स्त्रावाच्या चाचण्यासुद्धा निगेटिव्ह आल्याने चिमुकलीला करोना विषाणुचा संसर्ग झालेला नाही, हेही स्पष्ट झाल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड विलगीकरण कक्षात एकूण १९ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

२९ रुग्णांचे घेतले स्वॅब

जिल्हा रुग्णालयात रविवारी एकूण ४६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातील २९ जणांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, दोन दिवसांतील एकूण ६४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून १७ व्यक्तींचे अहवाल येणे बाकी आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयात ४४ रुग्ण देखरेखीखाली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) कोव्हिड वॉर्डात २२ व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी १७ जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. पाच जणांचे स्वॅब येणे बाकी आहेत, असे घाटीचे नोडल अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे.

‘सारी’चे सहा रुग्ण दाखल

‘सारी’च्या सहा रुग्णांना रविवारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘कोव्हिड केअर सेंटर’मधून २७ व्यक्तींचे स्वॅब घाटीच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शहरातील ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये ५३५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे आणि १६ व्यक्तींचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

कारभारी लयभारी: मारहाणीच्या घटनेनंतर ‘कारभारी लयभारी’ तील गंगाने मानले मुंबई पोलिसांचे आभार – karbhari laybhari ganga pranit hate thanks mumbai police

हायलाइट्स:व्हिडिओद्वारे मानले पोलिसांचे आभारपोलिसांनी केली तात्काळ मदतमारहाणीनंतर केला होता व्हिडीओ शूटमुंबई- काही दिवसांपूर्वी 'कारभारी लयभारी' या मालिकेत गंगाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला मारहाण झाली...

rahul gandhi push up: Rahul Gandhi : राहुल गांधींचे मंचावर पुशअप्स, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल – congress leader rahul gandhi push up with student...

हायलाइट्स:राहुल गांधी तीन दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यावरविद्यार्थ्यांसोबत स्टेजवर मारले पुशअप्समंचावर विद्यार्थ्यांसोबत घेतला थिरकण्याचा आनंदचेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी...

तोफखाना तज्ज्ञाकडे अरबी समुद्राची जबाबदारी

म. टा. प्रतिनिधी, विनाशिका श्रेणीतील युद्धनौकांच्या तोफांचे तज्ज्ञ असलेल्या अधिकाऱ्यांकडे आता संपूर्ण अरबी समुद्राची जबाबदारी आले आहे. या समुद्राच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पश्चिम...

Recent Comments