Home शहरं औरंगाबाद aurangabad News: सिल्लोड तालुक्यामध्ये वाटणार १३५ टन तांदूळ - 4 tonnes of...

aurangabad News: सिल्लोड तालुक्यामध्ये वाटणार १३५ टन तांदूळ – 4 tonnes of rice will be distributed in the silad taluka


म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत तालुक्यातील दोन लाख ६९ हजार लाभार्थींना १३५ टन तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक सदस्यांला पाच किलो तांदूळ देण्यात येणार असून, या महिन्यातील वाटप सुरू करण्यात आलेली आहे, अशी माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी दिली.

‘लॉकडाऊन’मुळे केंद्र शासनाने मोफत तांदूळ वाटप करण्याचा निर्णय घेत गरीब कुटुंबांना मोठा दिलासा दिला. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा तालुक्यातील तब्बल दोन लाख ६९ हजार लाभार्थींना लाभ मिळणार आहे. प्राप्त तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना वाटप करण्यात आला असून, लाभार्थींना वाटप सुरू करण्यात आलेले आहे. ‘लॉकडाऊन’मुळे अनेक कुटुंब मोठ्या अडचणीत सापडलेले आहे. त्यात हातावरील कुटुंबांचे तर मोठे हाल होत आहे. अनेकांनी मदतीचे हात पुढे करीत अन्नधान्य, किराणा सामानाचे वाटप ही केले.

आतापर्यंत ४० टक्के लाभार्थींना तांदूळ वाटप करण्यात आले आहे. २० एप्रिलपर्यंत सर्वांना वाटप करण्याचे नियोजन आहे. सर्व पात्र लाभार्थींना याचा लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थींनी फक्त गर्दी करू नये, ‘सोशल डिस्टंन्सिंग’चे नियम पाळावेत. या योजनेचा लाभ मिळाला नसल्यास, त्यांनी पुरवठा विभागाकडे तक्रार करावी.

– रामेश्वर गोरे, तहसीलदार, सिल्लोड

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Priyanka Gandhi Vadras Take A Step At Jhumur Dance In Assam Watch Video – Priyanka Gandhi : प्रियांका गांधी आसाममध्ये; आदिवासींच्या पारंपरिक ‘झूमर’ नृत्यात...

हायलाइट्स:प्रियांका गांधी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावरकामाख्या मंदिरात पूजा करून प्रचार मोहिमेला सुरुवातआदिवासींसोबत पारंपरिक 'झूमर' नृत्यात घेतला सहभागनवी दिल्ली : एकिकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष...

sharad pawar took covid19 vaccine: शरद पवार यांनी घेतली करोनावरील लस; केलं ‘हे’ आवाहन – sharad pawar took first dose of the covid19 vaccine...

हायलाइट्स:लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून सुरु६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणारपंतप्रधान मोदींपाठोपाठ पवारांनी घेतली लसमुंबईः आजपासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला...

कारभारी लयभारी: मारहाणीच्या घटनेनंतर ‘कारभारी लयभारी’ तील गंगाने मानले मुंबई पोलिसांचे आभार – karbhari laybhari ganga pranit hate thanks mumbai police

हायलाइट्स:व्हिडिओद्वारे मानले पोलिसांचे आभारपोलिसांनी केली तात्काळ मदतमारहाणीनंतर केला होता व्हिडीओ शूटमुंबई- काही दिवसांपूर्वी 'कारभारी लयभारी' या मालिकेत गंगाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला मारहाण झाली...

Recent Comments