Home शहरं औरंगाबाद aurangabad News: सीएचबी प्राध्यापकांचे मानधन रखडले - chb honors professors

aurangabad News: सीएचबी प्राध्यापकांचे मानधन रखडले – chb honors professors


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन रोखू नये, असे राज्य शासनाचे आदेश असूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बिकट झाला आहे. तसेच तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या १२९ प्राध्यापकांनाही मानधन मिळाले नाही.

विद्यापीठातील कंत्राटी आणि एकत्रित वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन मिळाले नाही. करोना साथीच्या प्रसाराला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. या कालावधीत कार्यरत नसलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखू नये किंवा कपात करू नये, असे राज्य शासनाचे आदेश आहेत. तरीही वेतन अजूनही मिळालेले नाही. याबाबत काही दिवसांपूर्वीच प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही वित्त व लेखा विभागाने कार्यवाही केली नाही. वेतन झाले नसल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली आहे. नागनाथ सदाफुले, मनीषा सदाफुले, अस्मिता जोंधळे यांनी वेतन तत्काळ देण्याची मागणी केली. या मागणीचा पाठपुरावा करीत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे आणि डॉ. राम चव्हाण यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना निवेदन दिले. कर्मचाऱ्यांचे वेतन तत्काळ करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच डिसेंबर महिन्यापासून सीएचबी प्राध्यापकांचे मानधन मिळाले नाही. विद्यापीठाच्या विविध विभागात १२९ प्राध्यापक तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. त्यांना सध्या मानधनाची नितांत गरज आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही मानधन मिळाले नाही. त्यातच लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांच्या अडचणीत भर पडली. या प्राध्यापकांचे मानधन तात्काळ द्यावे, अशी मागणी करपे आणि चव्हाण यांनी केली.

दरम्यान, विद्यापीठातील रोजंदारी कामगारांच्या वेतनाचा प्रश्नही बिकट झाला होता. कामगार संघटनांनी पाठपुरावा केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच वेतन अदा करण्यात आले.

बैठकीत केवळ चर्चा

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ११ एप्रिल रोजी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. या बैठकीत करपे यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि प्राध्यापकांच्या मानधनाचा मुद्दा उपस्थित केला होता. या चर्चेनंतर कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. कठीण काळात लवकर मदत करण्याची मागणी सदस्यांनी केली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

lection Results 2021 Live : '4 हजारांहून अधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा'

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (gram panchayat election result 2021) आज मतमोजणी होणार आहे. राज्यातील सत्तेची समिकरण बदलल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी...

sushant singh rajput case: सुशांतसिंह प्रकरणात मीडिया ट्रायल; हायकोर्टाचे केंद्रावर ताशेरे – media trial interferes with administration of justice and hence amounts to ‘contempt...

मुंबईः सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात प्रसारमाध्यमांकडून अतिरंजित व आक्षेपार्ह वार्तांकन होत असताना केंद्र सरकारने त्यावर वचक ठेवण्याचे कर्तव्य बजावण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले असं...

Mamata Banerjee: ममतांचे बंडखोर सुवेंदू अधिकरींना आव्हान, नंदीग्राममधून निवडणूक लढण्याची घोषणा – i will contest from nandigram assembly seat west bengal cm mamata banerjee...

कोलकाताः पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( mamata banerjee ) यांनी सोमवारी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ( nandigram...

'सॅमसंग'च्या उपाध्यक्षाला तुरुंगवासाची शिक्षा; 'या' गुन्ह्यात आढळला दोषी

सेऊल: मोबाइल, टीव्ही सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगचे उपाध्यक्ष जे वाय ली यांना अडीच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली...

Recent Comments