Home शहरं औरंगाबाद aurangabad News: सुरक्षित अंतर न ठेवल्याने फुलंब्रीत दंडात्मक कारवाई - fully punitive...

aurangabad News: सुरक्षित अंतर न ठेवल्याने फुलंब्रीत दंडात्मक कारवाई – fully punitive action for not keeping safe distance


म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

नगर पंचायतीने नेमेल्या पथकाने फुलंब्री शहरात सुरक्षित अंतराचा नियम न पाळणाऱ्या २७ नागरिकांकडून शनिवारी (१८ मार्च) दंड वसूल केला आहे. हा दंड किराणा दुकानदार; तसेच बाहेर फिरणारे नागरिक यांच्याकडून वसूल केला. व्यवसायाच्या ठिकाणी ‘सोशल डिस्टंन्सिंग’ न पाळणे, मास्क न वापरणे या कारणांसाठी केला आहे.

नगर पंचायतीने करोनाच्या आजारावर प्रतिबंधकासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. नगर पंचायतीच्या हद्दीतील काही किराणा दुकानदारांसह गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. शनिवारी केलेल्या दंडात्मक कार्यवाहीत २७ नागरिकांकडून प्रत्येकी शंभर रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील काही परिसरात नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. गर्दी होऊन अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढे आणखी कठोर धोरण राबविण्यात येईल. या नागरिकांनी पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता कायदा १९६०मधील तरतुदीनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगर पंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली. या पथकात नगर पंचायतीचे कर्मचारी सुदर्शन काथार, भाऊसाहेब राऊत, भगवान होनमाळी, गजानन तावडे, संदीप तुपे, अशोक पेटारे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

एटीएम कार्डाची चोरी; मग दारूची खरेदी

म. टा. खास प्रतिनिधी, इंदिरानगरमधील महिला दुकानदाराचे लक्ष विचलित करीत त्यांच्या पर्समधील २० हजारांची रोकड आणि एटीएम कार्डवर डल्ला मारला. यानंतर तब्बल १७...

महाविकास आघाडी: ‘हा’ विषय बावनकुळेंना समजू शकणार नाही; गृहमंत्र्यांचा पलटवार – the power outage in mumbai is a technical matter, says anil deshmukh

हायलाइट्स:मुंबईतील 'पॉवर कट'वरून भाजप-महाविकास आघाडी आमनेसामनेमाजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची राज्य सरकारवर टीकागृहमंत्री अनिल देशमुख यांचा बावनकुळेंवर पलटवारनागपूरः मुंबईत १२ ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा...

PM Modi: pm modi : PM मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये होणार तुफानी प्रचारसभा, भाजपची रणनीती तयार – assembly election 2021 pm modi bjp campaign strategy...

नवी दिल्लीः निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची ( assembly election 2021 ) घोषणा केली. त्यापुढच्या काही...

Recent Comments