Home शहरं औरंगाबाद aurangabad News: स्वस्त धान्य दुकानदाराची पोलिस पाटलाला धमकी - cheap food shopkeeper...

aurangabad News: स्वस्त धान्य दुकानदाराची पोलिस पाटलाला धमकी – cheap food shopkeeper threatens policeman


म टा…

Updated:

MT

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर

गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथे स्वस्त धान्य दुकानदाराने पोलिस पाटलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने दुकानदारावर शुक्रवारी (१७ एप्रिल) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष गवळी असे गुन्हा दाखल झालेल्या स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव असून, त्याने पोलिस पाटील यांना,’दुकानाच्या कामात हस्तक्षेप कराल तर, बंदुकीची गोळी घालेन,’ अशी धमकी दिली आहे.

‘लॉकडाऊन’मुळे नागरिकांना रोजगार नाही. त्यामुळे शासनाकडून धान्य देण्यात आले; तसेच प्राधान्य कुटुंबाला प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत वितरण सुरू आहे. येथे सुद्धा स्वस्त धान्य दुकानात मोफत तांदूळ वाटप सुरू आहे. यात ‘एपीएल’ व शेतकरी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य आलेले नाही. त्यामुळे काही महिला शिधापत्रिकाधारकांनी, ‘आम्हाला शासनाने ठरवून दिल्या प्रमाणे तांदूळ मिळाले नाहीत,’ अशी तक्रार पोलिस पाटील बाबासाहेब पडघन यांच्याकडे केली. त्यावेळी पडघन यांनी याची माहिती सरपंच सय्यद अनिस याना दिली; तसेच गवळी यांना दूरध्वनीवरून याबाबत विचारले. त्यावेळी दुकानदार गवळी याने,’तुम्ही माझ्या दुकानाच्या व्यवहारात लक्ष देऊ नका. नसता तुम्हाला गोळी मारून जीवे मारेन,’ अशी धमकी दिली. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात बाबासाहेब पडघन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Laxman Muthiyah: भारतीय मुलाने Microsoftच्या सिस्मटमध्ये बग शोधले, कंपनीने दिले ३६ लाख रुपये – chennai security researcher wins rs 36 lakh from microsoft for...

हायलाइट्स:भारतीय मुलानं Microsoftच्या सिस्मटमध्ये बग शोधलं मायक्रोसॉफ्ट कंपनीनं बक्षीस म्हणून दिले ३६ लाख रुपये Laxman Muthiyah असं या मुलाचं नाव आहे नवी दिल्लीःMicrosoft...

नगरमध्ये वेगळंच राजकारण! विरोधी पक्षाच्या उमेदवारासाठी भाजप नेत्याच्या मुलाची मोर्चेबांधणी – former mp dilip gandhi’s son bats for shiv sena leader candidate

हायलाइट्स:अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत वेगळंच राजकारणभाजपच्या माजी खासदाराच्या मुलाची शिवसेनेच्या दिवंगत नेत्याच्या मुलासाठी मोर्चेबांधणीश्रीपाद छिंदम याला अपात्र ठरविल्यानं होतेय पोटनिवडणूकअहमदनगर: नगरमध्ये एकमेकांचे पारंपरिक विरोधक...

Recent Comments