Home शहरं औरंगाबाद aurangabad News : हँड सॅनिटायझरचा काळाबाजार - black market for hand sanitizers

aurangabad News : हँड सॅनिटायझरचा काळाबाजार – black market for hand sanitizers


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bहँड सॅनिटायझरची चक्क किरकोळ व घाऊक किराणा दुकानांमधून विक्री होत आहे. त्यामुळे हा काळाबाजार थांबण्यावण्याबरोबर अन्न व औषध प्रशासनाला अशा बेकायदा विक्रीवर लक्ष ठेवावे लागत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढताना हँड सॅनिटायझरचा सुरुवातीला काळाबाजार समोर आला. खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायझर आणि मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या. सूचना येताच सॅनिटायझर आणि मास्कची मागणी वाढली. त्यात काळाबाजार मोठ्याप्रमाणात होत असल्याने तथा अत्यावश्यक वस्तूमध्ये समावेश झाला. त्यासाठीची नियमावली बनली. उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. काळाबाजार काहीसा थांबला असे चित्र असताना आता थेट किराणा दुकानांमध्ये सुद्धा याची विक्री होत असल्याचे समोर आले. त्यामुळे अन्न व औषधी प्रशासनही चक्रावले आहे.

सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तूमध्ये मोडते. त्यासह औषधी प्रशासन याच्याशी निगडित असल्याने ते किराणा दुकानांमध्ये विक्री करता येत नाही. मात्र, या नियमाची पायमल्ली करत किराणा दुकानांमध्ये त्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे आलेल्या आहेत. त्यावर विभागाने शहरासह सर्वत्र किराणा दुकानदारांना सॅनिटायझर विक्री करू नका, तशी विक्री होत असेल तर ती बेकायदा आहे, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. याबाबत अन्न व औषध प्रशासनाने जिल्हा व्यापारी महासंघला पत्र लिहले आहे. त्यात म्हटले आहे की, आपणास कळविण्यात येते की, औरंगाबाद जिल्ह्यातील काही किरकोळ, घाऊक किराणा विक्रेते हँड सॅनिटायझर साठवणूक व विक्री करत असल्याची माहिती कार्यालयाला प्राप्त झाली आहे. आपल्या सर्व सभासदांना कायद्याच्या तरतुदी निदर्शनास आणून औषध विक्री परवाना घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात. परवानगी आवश्यक असून अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून ऑनलाइन अर्ज करून परवानगी मिळते. जे किरकोळ घाऊक विक्रेते या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Bकाय सांगते नियमावली

Bऔषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० कलम ३ (ब) नुसार हँड सॅनिटायझर हे औषध या संकल्पनेत समाविष्ट होते. औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यातील तरतुदीनुसार औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा कलम १८ (क) नुसार हँड सॅनिटायझर साठवणूक व (फार्मासिस्ट शिवाय) किरकोळ व घाऊक विक्रीसाठी परवाना नमुना २० (ए) २० व २० (बी) ची तरतूद आहे. त्यासाठी आवश्यक तो परवाना घ्यावा लागतो.

सॅनिटायझरची विक्री परवाना असेल तरच विक्री करता येते. काही किराणा दुकानांमध्ये हँड सॅनिटायझरची विक्री होत असल्याचे समजले त्यावरून व्यापारी महासंघाला कळविले. त्यांनी दुकानदारांना तसे कळविले आहे. दुकानदारांनी विक्री करायची असेल तर परवानगी घ्यावी. अन्यथा कारवाईला सामोरे जावे.

B- संजय काळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासनBSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sushant Singh Rajput: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : एनसीबीचे आरोपपत्र – sushant singh rajput death case : first charge sheet has filed in sushant...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआय करत असतानाच त्यात काही व्हॉट्सअॅप संभाषणांच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे रॅकेट उजेडात आल्याने नार्कोटिक्स...

Recent Comments